बँक खात्याअभावी दीड हजाराचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:22+5:302021-07-08T04:22:22+5:30

राज्य शासनाने कोविड काळात रिक्षाचालकांना आधार देण्यासाठी ऑटो परवानाधारकास प्रत्येकी १५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. त्याकरिता अर्ज ...

Due to lack of bank account, grant of Rs | बँक खात्याअभावी दीड हजाराचे अनुदान रखडले

बँक खात्याअभावी दीड हजाराचे अनुदान रखडले

राज्य शासनाने कोविड काळात रिक्षाचालकांना आधार देण्यासाठी ऑटो परवानाधारकास प्रत्येकी १५०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. त्याकरिता अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली. जिल्ह्यात २२९३ परवानाधारक ऑटोरिक्षाचालक आहेत. या रिक्षाचालकांनी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. बऱ्याच परवानाधारकांकडे बँक खाते नसल्याने बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी काही ठरावीक रक्कम जमा करण्याचे बंधन आहे. काही बँका जमा होणारी ही रक्कम कर्ज खात्यात वर्ग करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने ७ जुलै रोजी झिरो बॅलन्स प्रकारातील पोस्ट बँक खाते उघडण्याविषयी मुख्य पोस्टमास्तर पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. चर्चेअंती जिल्ह्यातील ऑटोरिक्षा परवानाधारकांना झिरो बॅलन्स प्रकारातील पोस्ट बँक खाते उघडणे शक्य असल्याबाबत त्यांनी सांगितले. या योजनेचा लाभ सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांना देण्यासाठी परवानाधारकाने नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन झिरो बॅलन्स प्रकाराचे पोस्ट बँक खाते उघडावे. त्याकरिता परवानाधारकाचा मोबाइल क्रमांक व आधार कार्डची माहिती संबंधित पोस्ट ऑफिसला द्यावी. त्यानंतर सानुग्रह अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले आहे.

Web Title: Due to lack of bank account, grant of Rs