१२ केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:14+5:302021-07-08T04:22:14+5:30
उस्मानाबाद : कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कमी झाला नसल्याने नागरिक स्वत:हून पुढे येत कोरोना प्रतिबंधात्मक लस घेत आहेत. आरोग्य ...

१२ केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा डोस
उस्मानाबाद : कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कमी झाला नसल्याने नागरिक स्वत:हून पुढे येत कोरोना प्रतिबंधात्मक लस घेत आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने गुरुवारी जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा डोस उपलब्ध करून दिला आहे, तर ४५ वर्षांपुढील नागरिकांना ४६ केंद्रांवर कोविशिल्डचा डोस उपलब्ध करण्यात आला आहे. या केंद्रावर नागरिकांना पहिला व दुसरा डोस घेता येणार आहे. जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यांत तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक कोरोना संसर्गापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत. आरोग्य विभागाकडूनही ग्रामीण तसेच शहरी भागात लसीकरण मोहीम जोरात राबविली जात आहे. गुरुवारी १२ केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिनची लस उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रावर पहिला व दुसरा डोस उपलब्ध असेल, तर ४६ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध केली आहे. या केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना पहिला व दुसरा डोस घेता येईल. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण मोहीम सुरू राहील.
या ठिकाणी कोविशिल्ड
जिल्ह्यातील ४४ प्राथमिक आरोग्य केंद्र व उस्मानाबाद शहरातील वैराग रोड व रामनगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध असणार असून, या ठिकाणी पहिला व दुसरा डोस घेता येईल. ज्या व्यक्तींचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांना दुसरा डोस मिळेल.
येथे मिळेल कोव्हॅक्सिन
मुरुम, लोहारा, सास्तूर, भूम, वाशी, तेर ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, परंडा, कळंब उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील केंद्रावर कोव्हॅक्सिनचा डोस मिळेल.