शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

राखीव जागेवर रबरी स्टँप नको !

By admin | Updated: October 22, 2016 00:33 IST

उस्मानाबाद : महिलांसाठी राखीव असलेल्या जागावर उमेदवारी देताना उच्च शिक्षीत सक्षम महिलेऐवजी एखाद्या कार्यकर्त्याच्याच नातेवाईकाला उमेदवारी देण्याकडे

उस्मानाबाद : महिलांसाठी राखीव असलेल्या जागावर उमेदवारी देताना उच्च शिक्षीत सक्षम महिलेऐवजी एखाद्या कार्यकर्त्याच्याच नातेवाईकाला उमेदवारी देण्याकडे प्रमुख पक्षांचा कल असतो. तशीच परिस्थिती राखीव जागावर दिल्या जाणाऱ्या उमेदवारीबाबत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. तब्बल ५८ टक्के नागरिकांनी राखीव जागावर रबरी स्टँप उमेदवार देण्याऐवजी उच्चशिक्षीत, प्रश्नांची जाण असलेला उमेदवार द्यावा, अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. असा उमेदवार दिला तर त्या पक्षालाही याचा फायदा होईल, असे म्हटले आहे.महिलांसाठी राखीव सुटलेल्या जागावर सुशिक्षीत, सामाजिक कार्याची जाण असणाऱ्या महिलांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी मागील काही दिवसांपासून होत आहे. काहीसे असेच मत नागरिकांनी राखीव जागावर दिल्या जाणाऱ्या उमेदवारीबाबत व्यक्त केले आहे. प्रमुख राजकीय पक्ष ही राखीव जागेवरील निवडणूक लढविताना ती फारसी गांभिर्याने घेत नाहीत. किंबहूना आपल्या मर्जीतील उमेदवार रहावा, शिवाय तो निवडून आल्यास त्याने आपलेच ऐकावे असा कयास संबंधित पक्षाच्या श्रेष्ठींचा असतो. या प्रकारामुळे उमेदवार निवडून आल्यानंतरही त्या पक्षाला त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचेच अनेकवेळेस दिसून येते. त्यामुळेच राखीव जागावर उमेदवारी देताना त्या प्रवर्गातील उच्च शिक्षीत तसेच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्याला उमेदवारी द्यावी, असे या ५८ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. राखीव जागावर उमेदवारी देताना त्याच प्रवर्गातील सक्षम उमेदवाराला डावलले जात नाही, असे मतही २८ टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. तर या प्रश्नावर १४ टक्के नागरिकांनी होय राखीव जागावर उमेदवारी देताना सक्षम, उच्च शिक्षीत इच्छुकाला काही प्रमाणात डावलले जाते असे मत नोंदविले आहे.नागरिकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक शहरात पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. अलिकडील काळात नगरपालिकांना केंद्र तसेच राज्याच्या विविध योजनाद्वारे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी मिळतो. हा निधी खर्चूनही नागरिकांच्या समस्या काही सुटलेल्या नसल्याचेच कुठल्याही शहरामध्ये गेल्यानंतर प्रकर्षाने जाणवते. मात्र त्यानंतरही पाच वर्ष पालिका तसेच सदस्यांच्या नावे बोटे मोडणारे नागरिक निवडणूक काळात मात्र या प्रश्नांकडे कानाडोळाच करीत असल्याचे या सर्वेक्षणावेळी दिसून आले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक प्रश्नावर चर्चा करता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तब्बल ६० टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे. तर निवडणूक काळात उमेदवार तसेच पक्षांना याबाबत जाब विचारतो असे म्हणणाऱ्यांचे प्रमाण २५ टक्के होते. तर १५ टक्के नागरिकांनी याबाबत काही प्रमाणात चर्चा होते असे मत नोंदविले. (प्रतिनिधी)