वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:16+5:302021-07-08T04:22:16+5:30

पाथरुड : भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील तांबे परिवाराच्या वतीने वडील लक्ष्मण तांबे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला ...

Distribution of necessities to the elderly | वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पाथरुड : भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील तांबे परिवाराच्या वतीने वडील लक्ष्मण तांबे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत नळी वडगाव येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना पांघरण्यासाठी रजई, धान्य, फळे वाटप केली. येणारा हिवाळा लक्षात घेता या मदतीमुळे तेथील वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचा वाढदिवस यापुढे येथेच करण्याचा मानस तांबे कुटुंबाने येथे व्यक्त केला. यावेळी नंदकुमार पाटील, सी.एल. तांबे, प्राचार्य शशिकांत तांबे, ॲड. श्रीकांत तांबे, प्रदीप कांबळे, संचालक गहिनीनाथ लोखंडे यांच्यासह तांबे परिवाराचे सदस्य हजर होते.

070721\img-20210707-wa0017.jpg

    □ वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत नळीवडगाव येथील वर्धाश्रमातील वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  ; चिंचपूर ढगे येथील तांबे परिवाराने नळीवडगाव येथील वृद्धाश्रमास जिवाणआवश्यक वस्तूचे वाटप केले

Web Title: Distribution of necessities to the elderly