पोलीस महासंचालकांचे चौघांना सन्मानचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:31 IST2021-05-01T04:31:37+5:302021-05-01T04:31:37+5:30

उस्मानाबाद : पोलीस दलात कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल उस्मानाबादच्या चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह शुक्रवारी जाहीर झाले. याबद्दल ...

Director General of Police honors four | पोलीस महासंचालकांचे चौघांना सन्मानचिन्ह

पोलीस महासंचालकांचे चौघांना सन्मानचिन्ह

उस्मानाबाद : पोलीस दलात कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल उस्मानाबादच्या चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह शुक्रवारी जाहीर झाले. याबद्दल त्यांचा पोलीस अधीक्षकांनी सत्कार केला. पोलीस महासंचालकांकडून दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जातो. यावर्षीची नावे शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील सुमारे ७९९ जणांच्या नावाची घोषणा या सन्मानासाठी झाली आहे. यामधील चौघे हे उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत असलेले संजय सुबराव बाबर, राखीव पोलीस निरीक्षक शांताराम बबन वाघमोडे, येरमाळा येथील हेडकॉन्स्टेबल इजहार अहमद शेख व उस्मानाबाद ग्रामीण ठाण्यातील वाहेद गफूर मुल्ला यांना हे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. या सन्मानाबद्दल पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी चौघांचेही कौतुक करताना इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कार्यरत राहावे, असे आवाहन केले.

Web Title: Director General of Police honors four