दिलीप गुंड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:31+5:302021-07-09T04:21:31+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सुरतगावचे सुपुत्र तथा कल्याण डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी दिलीप गुंड यांचा सेवानिवृतीबद्दल गावकऱ्यांच्या ...

दिलीप गुंड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सुरतगावचे सुपुत्र तथा कल्याण डोंबिवली महापालिकेचे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी दिलीप गुंड यांचा सेवानिवृतीबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिलीप गुंड यांनी कल्याण डोंबिवली (आहेरवाडी ) महापालिकेत अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी म्हणून ४० वर्ष सेवा पूर्ण केली. ३० जून रोजी ते सेवानिवृत झाले. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच भागवत गुंड तर प्रमुख पाहुणे म्हणून कुमार गुंड, गणपत पुजारी उपस्थित होते. यावेळी सुरेश गुंड, अण्णासाहेब गुंड, विजय देवकर, प्रमोद गुंड, सुधाकर शेळके, शिवाजी मगर, नवनाथ सुरते, हरी पाटील, विलास पाटील, ज्ञानराज गुंड, पंडित काळे, विठ्ठल गुंड, माजी उपसरपंच, राम गुंड, पांडुरंग गुंड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दुष्यंत कटारे यांनी केले.