शिवसंपर्क अभियानांतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:33+5:302021-07-17T04:25:33+5:30

पाथरुड : येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत जिल्हाप्रमुख गौतम लटके यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्ष मजबूत करण्यासाठी गण व ...

Dialogue with activists under Shiv Sampark Abhiyan | शिवसंपर्क अभियानांतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद

शिवसंपर्क अभियानांतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद

पाथरुड : येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत जिल्हाप्रमुख गौतम लटके यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्ष मजबूत करण्यासाठी गण व गटात शाखेची पुनर्बांधणी, तसेच शाखा संघटन प्रबळ करण्यासाठी शिवसैनिकांनी सभासद नोंदणीवर भर द्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे व त्याचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जि.प. सभापती दत्तात्रय अण्णा साळुंखे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय मोहिते, माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू, युवासेना जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे, सोशल मीडियाचे राज्य समन्वयक अक्षय काळे, शिवसेना उपतालुका प्रमुख सुग्रीव मुरुमकर, बप्पासाहेब जाधव, विभाग प्रमुख गजेंद्र खुणे, युवासेना उपतालुका प्रमुख अशोक पन्हाळे आदी उपस्थित होते.

160721\img-20210716-wa0010.jpg

शिवसंपर्कअभियानातॅगत पाथरुड येथे संवाद साधताना

Web Title: Dialogue with activists under Shiv Sampark Abhiyan