शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
6
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
7
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
8
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
9
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
10
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
11
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
12
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
13
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
14
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
15
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
16
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
17
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
18
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
19
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
20
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: साठवण तलाव फुटून पिकांसह माती वाहून गेली; १५० एकरवर शेतीचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:14 IST

शेतकऱ्यांचे अश्रू, प्रशासनाची पाहणी; मदत कधी मिळणार?

- संतोष वीर

भूम (धाराशिव): भूम शहरालगत असलेल्या साबळेवाडी येथील साठवण तलाव क्रमांक १ शुक्रवारी अचानक फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार जयवंत पाटील आणि जलसंपदा विभागाचे उपअभियंता माणिक देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

३० एकरवरील पीक मातीसहित खरडून गेलेया दुर्घटनेत जवळपास १५० ते १७० एकर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. यामध्ये सुनगिरी शिवारातील सुमारे १०० एकर आणि साबळेवाडी भागातील ७० एकर शेतजमिनींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील ३० ते ४० एकर क्षेत्रावरील उभे पीक पुराच्या पाण्यासोबत मातीसहित खरडून वाहून गेले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

कारणांबाबत चर्चा आणि संतापअचानक फुटलेल्या या पाझर तलावामागे नेमके काय कारण आहे, याबाबत चौकशी सुरू आहे. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता माणिक देशमुख यांनी सांगितले की, “साबळेवाडी भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे तलावाच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी आले. त्यामुळे सांडव्यातून पाण्याचा योग्य निचरा होऊ शकला नाही आणि तलाव फुटला.” मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी तलावाच्या भिंतींच्या देखभालीतील त्रुटींमुळे ही दुर्घटना घडल्याची शंका व्यक्त केली आहे.

तात्काळ मदतीची मागणीया दुर्घटनेनंतर शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. शेतकरी विजय साबळे म्हणाले, "पूर्ण खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. प्रशासनाने नुसती मदत जाहीर न करता, ती तात्काळ प्रत्यक्षात देणे अपेक्षित आहे."

नुकसानीचे पंचनामे सुरूतहसीलदार जयवंत पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून, मदतीचा निधी मिळताच तो तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन दिले आहे. यासोबतच, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून इतर साठवण तलावांचीही तपासणी करून संभाव्य धोके टाळण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसdharashivधाराशिवAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी