शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

धाराशिवच्या सरपंचावर हल्ला झालाच नाही; बंदुकीच्या लायसन्ससाठी स्वत:च रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 18:49 IST

बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी सरपंच व मित्राने रचला हल्लायाचा बनाव, पोलिसांसमोर दिली कबुली.

धाराशिव: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हदरला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच धाराशिवमधील एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर आली होती. पण, आता या घटनेत एक नवा ट्विस्ट आला आहे. सरपंच नामदेव निकम यांनी बंदुकीचे लायसन्स मिळवण्यासाठी स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. 

तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर 26 डिसेंबरच्या रात्री हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. दोन दुचाकींवरुन आलेल्या चार अज्ञातांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा दावा निकम यांनी केला. कारच्या काचेवर अंडी, दगड, पेट्रोल भरलेले फुगे मारले आणि मला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला होता. हा प्रकार पवनचक्की प्रकरणाशी निगडित असावा, असा संशय व्यक्त करून निकम यांनी तुळजापूर पोलिसांकडे चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

घटनास्थळाची सूक्ष्म पाहणी करून पोलिसांनी पंचनामा केला. शिवाय, या प्रकरणात तंत्रज्ञानाचीही मदत घेण्यात आली. मात्र, हल्लेखोराचा मागमूस काही केल्या लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी सरपंच नामदेव निकम व घटनेवेळी सोबत असलेला त्यांचा मित्र प्रवीण इंगळे यांची उलटतपासणी घेतली. त्यांनी सांगितलेला घटनाक्रम व घटनास्थळावरील परिस्थितीशी जुळत नव्हती. त्यामुळे खोलात जाऊन तपासणी केल्यानंतर दोघांनीही आपणच हा बनाव केल्याचे कबूल केल्याची माहितीही पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. 

स्वत:च केली वाहनाची तोडफोड...फिर्यादी सरपंच नामदेव निकम यांचा पुण्यात ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. बहुतांश वेळ ते पुण्यातच असतात. ते बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मस्साजोगचे प्रकरण तापलेले असल्याने यात हा परवाना मिळणे सोपे होईल, असा कयास लावून निकम यांनी मित्र प्रवीण इंगळेसह हल्ल्याचा बनाव रचला. त्यांच्या वाहनाची निकम यांनी स्वत:च तोडफोड केल्याचेही चौकशीतून समोर आले आहे. 

 

टॅग्स :dharashivधाराशिवCrime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस