झाड तोडणाऱ्यावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:35 IST2021-08-27T04:35:37+5:302021-08-27T04:35:37+5:30

समाजिक कार्यकर्ते डॉ. उदय मोरे यांच्या पुढाकाराने रोटरी, व्यापारी संघ व आयएमएच्या सहकार्याने हरित शहर या अंतर्गत शहरात ...

Demand for action against tree cutters | झाड तोडणाऱ्यावर कारवाईची मागणी

झाड तोडणाऱ्यावर कारवाईची मागणी

समाजिक कार्यकर्ते डॉ. उदय मोरे यांच्या पुढाकाराने रोटरी, व्यापारी संघ व आयएमएच्या सहकार्याने हरित शहर या अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. यात रस्त्यालगतच्या दुकानासमोर ही वृक्षरोपण करून त्या-त्या संबंधित दुकानदाराने त्या वृक्षाची जोपासना करावी, असे ठरले होते. शहरातील अनेक दुकानदारांनी मागील पाच वर्षात या वृक्षाची चांगली जोपासना देखील केली आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स येथील नितीन होळे यांच्या दुकानासमोर असलेले पिंपळाचे झाड कापून नेले. यामुळे वृक्षप्रेमींतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबतीत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वृक्षप्रेमी डॉ. उदय मोरे, भाजपचे राज्य सरचिटणीस संताजी चालुक्य, व्यापारी महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन होळे, भाजप जिल्हा सरचिटणीस माधव पवार, डॉ. दीपक पोफळे, बाबू स्वामी, मनिष सोनी, संजय देशमुख, प्रवीण स्वामी आदींनी केली आहे.

Web Title: Demand for action against tree cutters