शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

घरे पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST

भूम : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील मागासवर्गीयांची घरे जेसीबीने उद्‌ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच त्याच जागेवर घरकूल योजनेतून घरकूल ...

भूम : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील मागासवर्गीयांची घरे जेसीबीने उद्‌ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच त्याच जागेवर घरकूल योजनेतून घरकूल बांधून पुनर्वसन करावे, अशी मागणी रिपाइंच्या वतीने मराठवाडा उपाध्यक्ष भागवतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खामसवाडी येथील जवळपास १९ कुटुंबांना कसल्याही प्रकारची नोटीस न देता जेसीबीच्या साह्याने त्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. यात त्यांच्या संसारोपयोगी भांडी व इतर धान्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे याचा तातडीने पंचनामा करावा, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना किंवा इतर योजनेतून त्या ठिकाणी घरे बांधून देऊन सर्व कुटुंबाचे पुनर्वसन करावे, मागासवर्गीय बेरोजगारांना तत्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावा, सरपंच आणि इतरांवर गुन्हे दाखल करावेत, राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत झालेल्या कामाची चौकशी करावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणात दोन दिवसात कारवाई नाही झाल्यास उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.

या निवेदनावर तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, उपाध्यक्ष उत्तम सोनवणे, शुभम सोनवणे, रोहित सोनवणे, जयभीम सोनवणे, कुणाल साठे, अभिजीत गवळी, राहुल आवारे, सुधीर गायकवाड, अनिकेत सावंत, माणिक थोरात, पंचशील गायकवाड, विश्वजीत सोनवणे, धम्मदीप सोनवणे, सुजित शिंदे, गोकुळ गवळी, अनिल भालेराव आदींच्या सह्या आहेत.