कळंबच्या हद्दीवर चेक पोस्टची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST2021-04-17T04:32:50+5:302021-04-17T04:32:50+5:30

कळंब : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळंब पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला असून, शहरात प्रवेशित होणाऱ्या केज रोडवर ‘ चेक पोस्ट ’ ...

Construction of check post at Kalamb border | कळंबच्या हद्दीवर चेक पोस्टची निर्मिती

कळंबच्या हद्दीवर चेक पोस्टची निर्मिती

कळंब : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळंब पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला असून, शहरात प्रवेशित होणाऱ्या केज रोडवर ‘ चेक पोस्ट ’ लावत पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. यामुळे अकारण कळंबची वारी करणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे.

कळंब शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध निर्बंध लादलेले आहेत. संचारबंदी लावत विविध आस्थापने बंद ठेवली आहेत. असे असतानाही अकारण भटकंती करणाऱ्यांची सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.

यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी शहर व ग्रामीण असे विशेष नियोजन करत बंदोबस्तात वाढ केली आहे.

याचाच एक भाग म्हणून कळंब केज या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कळंब शहरात प्रवेशित होणाऱ्या पॉईंटला ‘चेक पोस्ट’ कार्यान्वित केला आहे. याठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. असाच एक चेक पोस्ट बार्शी रोडवरही करण्यात आला आहे.

याठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या रहदारीवर लक्ष ठेवत, त्यांना थांबवत प्रवासाचे कारण विचारले जात आहे. यात अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास असेल तर त्यांना अनुमती देण्यात येत आहे. यामुळे अकारण भटकंती व तालुक्याची वारी करणाऱ्यांना मात्र चाप बसणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Construction of check post at Kalamb border