देशातील जनता कोरोनाच्या संकटाने, महागाई, बेरोजगारीने त्रस्त झालेली असताना जनतेला आधार देण्याऐवजी मोदी सरकार पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढून तिजोऱ्या भरण्यात मग्न आहे. जनता जगली काय आणि मेली काय याच्याशी त्यांना काडीमात्र देणे-घेणे नाही. दररोज वाढत चाललेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे. जगणे कठीण झाले आहे. जनतेला होरपळवणाऱ्या केंद्र सरकाचा धिक्कार करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील, सरचिटणीस जावेद काझी, हरिभाऊ शेळके, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, युवकचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक दर्शन कोळगे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, मिलिंद गोवर्धन, जिल्हा सचिव सुरेंद्र पाटील, बेंबळीचे उपसरपंच सत्तार शेख, अमर माने, असंघटित कामगार अध्यक्ष देवानंद ऐडके, सेवा दलाचे अध्यक्ष प्रणित डिकले, विधी विभागाचे विश्वजित शिंदे, अतुल देशमुख, किसान काँग्रेसचे गौरीशंकर मुळे, युवकचे प्रदेश प्रवक्ते कृष्णा तवले, सलमान शेख, संजय गजधने, किशोर राऊत, कफिल सय्यद, नियामत मोमीन, विद्यार्थी काँग्रेसचे सौरव गायकवाड, समाधान घाटशिळे, सचिन धाकतोडे, सुधीर अलकुंटे, प्रेम सपकाळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
घोषणांनी दणाणला परिसर
इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस भवन परिसरातून रॅलीस प्रारंभ झाला. जिल्हा रुग्णालय, काळा मारुती चौक, माउली चौक, नेहरू चौक, देशपांडे स्टँण्ड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे चौक परिसरातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून काँग्रेस भवन मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘मोदी सरकारचा धिक्कार असो...’ जनतेची लूट थांबलीच पाहिजे...’ ‘पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ रद्द करा...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.