तामलवाडीतील ऐतिहासिक जामा मशिदीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:20+5:302021-07-08T04:22:20+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ऐतिहासिक जामा मशिीची मोठी दुरवस्था झाली असून, या ऐतिहासिक वास्तूकडे प्रशासनाचे व पुरातत्त्व ...

तामलवाडीतील ऐतिहासिक जामा मशिदीची दुरवस्था
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ऐतिहासिक जामा मशिीची मोठी दुरवस्था झाली असून, या ऐतिहासिक वास्तूकडे प्रशासनाचे व पुरातत्त्व विभागाचे देखील दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रा. जुबेरपाशा शेख यांनी केली आहे.
सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर काटी हे १५ हजार लोकसंख्येचे गाव. येथे ऐतिहासिक आणि इस्लामिक स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेली जामा मशीद आहे. मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील सुंदर मशीद म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. याच्या चोहोबाजूंनी मिनार असून, त्यावर कमळाच्या आकाराच्या पाकळ्या आहेत. छोटासा गोलाकार घुमट देखील लक्ष वेधून घेतो. इतिहासकार कुशल दलाल यांच्या अभ्यासानुसार काटी हे गाव निजामशहा, आदिलशहा, हैदराबादचे निजाम यांच्या सत्तेचे एक महत्त्वाचे केंद्र होते. सेनापती याकूब मेमन यांच्या पत्नीने त्यांच्या निधनानंतर पतीची आठवण म्हणून ही मशीद स्वतःच्या पैशातून बांधली आहे. याचे बांधकाम बादशहा ब्रुहानशहाचा कालखंडात झाले आहे. इतिहासकारांच्या मते याकूब मेमन यांची कबर देखील या मशिदीच्या समोर बांधण्यात आली असावी;
परंतु वर्षानुवर्षे प्रसिद्धी व विकासापासून वंचित असलेली या ऐतिहासिक वास्तूची आज दुरवस्था झाली आहे. येथील भिंतींची पडझड तसेच मिनारची पडझड होत असून, यामुळे ही वास्तू ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याची तात्काळ दुरुस्ती करून वास्तू जतन करावी, अशी मागणी जुबेरपाशा शेख व ग्रामस्थांनी केली केली आहे.