शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, कमी झोपेमुळे प्रतिकारशक्तीही खालावते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:35 IST

कोरोना संक्रमणाच्या काळात अनेकांनी रोगप्रतिकारशक्तीचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले. वर्क फ्रॉम होम असल्याने वेळेवर जेवणासोबतच पौष्टिक आहारावर भर देण्यात ...

कोरोना संक्रमणाच्या काळात अनेकांनी रोगप्रतिकारशक्तीचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले. वर्क फ्रॉम होम असल्याने वेळेवर जेवणासोबतच पौष्टिक आहारावर भर देण्यात आला होता. अनेकजण औषधे घेऊनही रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आता काेरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बाजारपेठ पूर्ववत सुरू झाल्याने वर्क फ्रॉम होम देखील बंद झाले आहे. त्यामुुळे आता प्रत्येकाची जीवनशैली बदलली असून दगदगीचे जीवन झाले आहे. त्याचा परिणाम जेवणासाेबतच झोपेवरही झाला आहे. दिवसभराची दगदग, अपूर्ण झाेप यामुळे ट्रेस हार्मोन्स वाढत आहेत. त्याचा थेट परिणाम प्रतिकारशक्तीवर होताना दिसून येत आहे. उपजत रोगप्रतिकारशक्तीसाठी सर्वसमावेशक आहार, दररोज व्यायाम आणि आणि किमान सहा तास झोप आवश्यक आहे.

किमान सहा तास झोप आवश्यक

निरोगी शरीरात पुरेशा झोपेचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे साधारणपणे सहा ते आठ तास झोप आवश्यक आहे. झोपेमुळे शरीराची झालेली झीज भरून निघते. तसेच मेटाबॉलिझम अर्थात चयापचय क्रियाही झोपेमुळे साधारण राहते.यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अपूर्ण झोपेचे हृदय आणि मेंदूवर अधिक दुष्परिणाम दिसून येत असल्याचे अभ्यासक सांगतात.

वयोगटानुसार किमान झोपेचे तास

-० ते३ महिने -कमीत कमी१४-१७ तास.

- ५-११ महिन्यांचे बाळ- १२-१४ तास.

- १-२ वर्षांचे मुल- ११-१३ तास.

- ३-५वर्षांचे मुल- १०-१२ तास.

- ६-१३ वर्षात- ९ ते ११ तास.

- १४-१७ वर्षे -८- १० तास.

-१८ ते ६४ वर्षे- ६- ८ तास

- ६५ वर्ष वृद्ध- ७-८ तास

अपुप्या झोपेचे तोटे

- अपुऱ्या झोपेमुळे हृदयाचे विकार, रक्तदाब, रक्तातील साखर वाढते.

- चिडचिड, नैराश्य येणे, लैंगिक क्षमतेवर परिणाम यांसारखे गंभीर आजार होतात.

- शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या तक्रारी समोर येतात.

रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीराची ढाल

- शरीरामध्ये होणारा कोणत्याही प्रकारचा जंतूसंसर्ग तसेच ॲलर्जीपासून संरक्षण करण्याचे काम रोगप्रतिकारशक्ती करते.

- विविध गोष्टींमुळे शरीरात होणारे रिॲक्शन थांबविण्याचे काम रोगप्रतिकारशक्ती करीत असते.

- त्यामुळे निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे.

संतुलित आहार आणि व्यायामही आवश्यक

अलीकडे बदलते वातावरण, अपूर्ण आहार, कमी झोप तसेच व्यायामाचा अभाव यामुळे प्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम जाणवतो.सकस आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि ताणतणावमुक्त जीवन या चार बाबींमुळे रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते.

डॉक्टरचा कोट

'' निरोगी शरीरात पुरेशा झोपेचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळे साधारणपणे सहा ते आठ तास झोप आवश्यक आहे. सकस आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि ताणतणावमुक्त जीवन या बाबींमुळे रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते. झोप जर पूर्ण झाली नाही तर ट्रेस हार्मोनमध्ये वाढ होते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती कमी होते.निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे.''

- डॉ अभय शिंदे,उमरगा.