गावागावात स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST2021-02-24T04:33:21+5:302021-02-24T04:33:21+5:30

नवे पदाधिकारी, अधिकारीही सहभागी परंडा : ‘सुंदर माझं गाव, सुंदर माझं कार्यालय’ या अभियानात परंडा पंचायत समितीच्या हद्दीतील जवळपास ...

Awareness of cleanliness in villages | गावागावात स्वच्छतेचा जागर

गावागावात स्वच्छतेचा जागर

नवे पदाधिकारी, अधिकारीही सहभागी

परंडा : ‘सुंदर माझं गाव, सुंदर माझं कार्यालय’ या अभियानात परंडा पंचायत समितीच्या हद्दीतील जवळपास सर्वच ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला असून, यामुळे गावागावात सध्या स्वच्छता अभियानासह विविध उपक्रम राबविले जात आहेत.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर नवे कारभारी ग्रामपंचायतींना मिळाल्याने नव्या जोमाने हा उपक्रम हाती घेऊन स्वच्छतेला महत्त्व दिले जात आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात स्वच्छता, नाले सफाई, शोषखड्डे घेणे, ग्रामपंचायतीच्या इमारतीची रंगरंगोटी यासह परसबाग, अपूर्ण घरकूल पूर्ण करणे, ग्रामपंचायतीचे अभिलेखे अद्यावत करणे, ही कामे हाती घेण्यात येत आहेत. यासाठी पदाधिकाऱ्यांसह ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थांनीही पुढाकार घेतला आहे.

यासाठी पंचायत समिती सभापती अनुजाताई दैन, गटविकास अधिकारी सुरेश तायडे, पदाधिकारी व अधिकारी ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करीत आहेत.

Web Title: Awareness of cleanliness in villages