सलून व्यवसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:14+5:302021-04-11T04:32:14+5:30

या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पहिल्या लॉकडाऊन कालावधीत सलूनची दुकाने बंद करण्यात आल्याने सलून व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा ...

Allow salon professionals to open shops | सलून व्यवसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी द्या

सलून व्यवसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी द्या

या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पहिल्या लॉकडाऊन कालावधीत सलूनची दुकाने बंद करण्यात आल्याने सलून व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. अनेकांनी दागिने विकून घरभाडे, विज बिल भरणा, दुकान भाडे तसेच कर्जाचे हप्ते फेडले होते. सलून व्यावसायिकांची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाच आता शासनाने पुन्हा सलून दुकाने बंद केली आहेत. त्याचा फटका व्यावसायिक व कारागीरांना बसत आहे. त्यामुळे शासनाने सलून व्यवसायिकांना दुकाने उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, प्रदेश संघटक किशोर राऊत, ज्ञानेश्वर पंडीत, बाबासाहेब गायकवाड, रामचंद्र दिघे, जगन्नाथ पवार, अक्षय माने, अमोल चौधरी, शंकर गाेरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या आहेत मागण्या

सलून दुकाने पूर्ववत चालू ठेवण्यास परवानगी द्या,

सलून व्यवसायिक व कारागीरांना लस द्यावी,

कोरोना काळात आत्महत्याग्रस्त सलून व्यावसायिकांच्या कुटूंबाना आर्थिक मदत देण्यात यावी,

सलून व्यावसायिकांना ५० लाखाचे विमा कवच द्यावे,

शासकीय गाळ्यातील सलून दुकानाचे भाडे माफ करावे,

सलून व्यवसायिकांना जिवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा,

प्रतिमहिना २० हजार रुपयांची मदत जाहीर करावी,

Web Title: Allow salon professionals to open shops