भूम तालुक्यासाठी १४० पेरणीयंत्रे

By Admin | Updated: June 1, 2014 00:26 IST2014-05-31T23:58:24+5:302014-06-01T00:26:51+5:30

भूम : पारंपरिक पद्धतीने शेती कसण्यात होणारा विलंब, येणार्‍या अनेक समस्या यावर मात करण्यासाठी आधुनिक पद्धतीची पेरणीयंत्रे बाजारपेठेत दखल झाली आहेत़

140 parantrains for earthquake | भूम तालुक्यासाठी १४० पेरणीयंत्रे

भूम तालुक्यासाठी १४० पेरणीयंत्रे

 भूम : पारंपरिक पद्धतीने शेती कसण्यात होणारा विलंब, येणार्‍या अनेक समस्या यावर मात करण्यासाठी आधुनिक पद्धतीची पेरणीयंत्रे बाजारपेठेत दखल झाली आहेत़ शेतकर्‍यांना याचा अनुदानावर लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागाच्या वतीने तालुक्यासाठी १४० पेरणीयंत्राचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ त्यामुळे रितसर अर्ज करून याचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ सुरू असून, यामुळे पेरणी सुलभ होणार आहे़ आधुनिक युगात पारंपरिक पध्दतीने शेती उद्योग करताना शेतकर्‍यांसमोर समस्यांचा डोंगर उभा राहत आहे़ बैलजोडीची समस्या, जुनी औजारे, निसर्गाचा ढासळलेला समतोल, आस्मानी, सुलतानी संकटांचा सामना करताना शेतकरी आधुनिक पध्दतीने शेती करण्यावर भर देत आहेत़ शेतकर्‍यांना अनुदानावर बीबीएफ ट्रॅक्टर (बीबीएफ यंत्र) कृषी विभागाच्या वतीने देण्यात येत आहे़ यंदा तालुक्यासाठी १४० यंत्राचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ या पेरणीयंत्रांमुळे एकाच वेळी वाफा (बडे) तयार होण्यासह पेरणी, रासनही होते़ शेतकर्‍यांनी हे यंत्र खरेदी करून याचा लाभ घ्यावा, माहितीसाठी कृषी अधिकारी साळुंके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एम़एस़पोले यांनी केले आहे़ (वार्ताहर) असा राहणार लोकवाटा अनुसूचित जाती, जमाती, महिला लाभार्थी यांना यासाठी चार हजार ३४८रुपये प्रतिनग लोकवाटा आहे़ इतर लाभार्थ्यांसाठी १३ हजार ३४८ प्रतिनग लोकवाटा राहणार आहे़ दरम्यान, मशागत वेळेवर व्हावी, यासाठी शेतकर्‍यांनी या नवीन बीबीएफ यंत्रासाठी कार्यालयाशी संपर्क साधावा़ अधिकाधिक शेतकर्‍यांनी अर्ज करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एम़एस़पोले यांनी केले आहे़

Web Title: 140 parantrains for earthquake