शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

धाकटा भाऊच निघाला मारेकरी; मित्रांच्या मदतीनं बहिणीवर झाडल्या ९ गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 9:55 PM

Murder Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावाने आपल्या मित्रासह त्याच्या बहिणीची हत्या केली.

ठळक मुद्देही घटना घडवण्यासाठी होशियारपूर पोलिसांनी बंदूक तसेच ३ वाहनेही ताब्यात घेतली आहेत.  

चंदीगड - पंजाब पोलिसांनी १७ दिवसांत होशियारपूरमध्ये एका महिलेच्या हत्येचे गूढ सोडवले आहे. पोलिसांनी महिलेचा धाकटा भाऊ आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावाने आपल्या मित्रासह त्याच्या बहिणीची हत्या केली.

 

बहिणीच्या छातीवर ९ गोळ्या झाडल्या 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल रोजी होशियारपूरच्या सिक्री येथे मनप्रीत कौर नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली होती. या सनसनाटी हत्येचे गूढ उकळून पोलिसांनी मनप्रीत कौरचा धाकटा भाऊ आणि एका मित्राला अटक केली आहे. ज्याने आपल्या बहिणीच्या छातीवर ९ गोळ्या घालून तिची हत्या केली.पोलिसांनी बंदूक आणि ३ गाड्या जप्त केल्या

या प्रकरणाची माहिती देताना एसएसपी नवज्योत सिंग महाल यांनी सांगितले की, हरप्रीतने आपल्या बहिणीची हत्या केल्यानंतर २१ एप्रिल रोजी सिक्री बसस्थानकाजवळील शेतावर मृतदेह फेकला. २२ एप्रिल रोजी सकाळी लोक शेतात कामासाठी आले असता, खून उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली. ही घटना घडवण्यासाठी होशियारपूर पोलिसांनी बंदूक तसेच ३ वाहनेही ताब्यात घेतली आहेत. मनप्रीतने कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध लग्न केले

घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मनप्रीत कौरने कुटूंबाच्या इच्छेविरोधात सुमारे ८ वर्षांपूर्वी होशियारपूरच्या खडियाला गावात राहणाऱ्या पवनदीप सिंगशी लग्न केले होते. तथापि, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि हाणामारीनंतर कोर्टात घटस्फोटाचा खटला चालू होता.पोलिसांनी हत्येची कारणे उघड केली

एसएसपी नवज्योत सिंग यांनी हत्येमागील कारणांची माहिती देताना सांगितले की, पतीशी झालेल्या वादानंतर मनप्रीत कौरला तिच्या आईवडिलांकडे परत जायचे होते, परंतु धाकटा भाऊ हरप्रीत याला ते मान्य नव्हते. त्याला कुटूंबाची बदनामी आणि समाजात होणारी नाचक्कीची भीती वाटत होती. यानंतर त्याने आपला मित्र इक्बाल सिंग याच्यासह हत्येचा कट रचला.अशाप्रकारे आरोपींनी खुनाची अंमलबजावणी केली

पोलिसांनी सांगितले की, खुनाच्या दिवशी हरप्रीत आणि इक्बाल सिंग हे गाडीने घटनास्थळी आले. या दरम्यान, इक्बाल गाडी चालवत होता, तर हरप्रीत मागील सीटवर लपला होता. दोघांनी आधी एका राहणार्‍याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यानंतर इक्बालने व्हॉट्सअॅपवर फोन करून मनप्रीतला भेटण्यास सांगितले. मनप्रीत तिथे पोहोचल्यावर इक्बालने त्याला महत्वाच्या बोलण्याचे निमित्त सांगून  मागील सीटवर बसण्यास सांगितले. यानंतर हरप्रीतने मनप्रीतचा गळा दाबला, ज्यामुळे तो बेशुद्ध झाला. यानंतर त्याने मनप्रीतला वाहनातून बाहेर काढले आणि ३२ बोअरच्या रिव्हॉल्व्हरमधून ९ गोळ्या झाडल्या आणि त्या जागीच ठार झाल्या.

टॅग्स :ArrestअटकPunjabपंजाबPoliceपोलिसFiringगोळीबारmarriageलग्न