शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

भोरगिरी येथे धबधब्यावरून पाय घसरून तरूणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 18:15 IST

राजगुरुनगर येथे एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून तांगडे काम करत होता.

राजगुरुनगर : भोरगड (ता. खेड) येथे देवदर्शनाला जात असताना २३ वर्षीय तरुणाचा धबधब्यावर पाय घसरून पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमीनाथ विठ्ठल तांगडे (रा. मुळ गाव. वडदतांगडा ता. भोकरदन ,जि. जालना) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजगुरुनगर येथे एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून तांगडे काम करत होता. मंगळवारी तांगडे व त्याचा मित्र प्रदीप पावरा  भोरगिरी येथे धबधबे पाहण्यासाठी व देवदर्शनासाठी गेले होते. दुपारी २ च्या सुमारास तांगडे हा धबधब्याजवळ बसलेला होता. त्याचा मित्र प्रदिप शिवलिंंगाचे दर्शन घेऊन परत खाली येत असताना तांगडे धबधब्याच्या पाण्यात पडल्याचे लक्षात आले. तांगडे याला पोहता येत नव्हते. प्रदिप यांने तात्काळ हॉटेल मालकाला फोनद्वारे ही माहिती कळवली. सदर घटनेची बुधवारी सकाळी खेड पोलीस स्टेशनला माहिती दिली. यावेळी तात्काळ पोलीस घटनास्थळी जाऊन धबधब्याच्या पाण्याच्या डोहात पाण्यात लोखंडी पंजा, गळ दोरी बांबूच्या साह्याने तांगडे यांचा शोध घेत असताना तो मृत्युमुखी पडलेला अवस्थेत आढळून आला.तात्काळ पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. याबाबत खेड पोलिस ठाण्यात मयत तांगडे याचा मामा ज्ञानेश्वर पांडुरंग बोराटे यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Khedखेडdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू