शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

वडगाव मावळ परिसरात पूर्व वैमनस्यातून तरुण उद्योजकाचा निर्घृण खून, पाच तासांत आरोपी जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 2:28 PM

तीन मोटारसायकलवरून आलेल्या सात ते आठ जणांनी कोयत्याने यश यांच्या डोक्यावर, हातावर वार केले.

वडगाव मावळ : पूर्व वैमनस्यातून टाकवे बुद्रुक येथे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास एका तरुण उद्योजकाचा निर्घृण खून करण्यात आला. आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.यश रोहीदास असवले वय २२ रा. टाकवे बुद्रुक असे खूण झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी रूतीक बाळू असवले (वय २०) अजय बबन जाधव (वय २४ ) दोघेही रा.टाकवे, अतिष राजु लंके (वय २१) रा.वनननगर तळेगाव दाभाडे, विकास उर्फ बापू विष्णू रिठे (वय २३) रा.गुरूदत्त कॉलनी वराळेरोड तळेगाव, रूतीक कांताराम चव्हाण (वय १९),रा.म्हाळसकर वाडा वडगाव मावळ, अश्विन कैलास चोरघे ( वय २२) रा.घोणशेत रोड मावळ, निखील भाऊ काजळे (वय २०) रा.वडगाव मावळ अशी अटक केलेल्यांची नावे असून त्याच्या कडील तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.               वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोणशेत टाकवे रस्त्यावर तीन मित्रांबरोबर रोजच्या प्रमाणे संध्याकाळी फिरायला गेला होता. रात्री दहाच्या सुमारास  टाकवे बाजुकडून तीन मोटारसायकलवरून आलेल्या सात ते आठ जणांनी कोयत्याने डोक्यावर, हातावर वार केले. यश रक्ताच्या थारोळ्यात पडल्या नंतर हल्लेखोर पळून गेले. गंभीररित्या जखमी झालेल्या यशला तातडीने सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. 

 वडगाव पोलिसांनी सात आरोपींना अटक करून पाच तासांत गुन्हा उघकीस आणला. खून केल्यानंतर आरोपी वडगाव येथील डेक्कन हिल्सजवळ पाण्याच्या टाकीजवळ लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिस अधिक्षक संदिप पाटील, अप्पर अधिक्षक विवेक पाटील, सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप देसाई, शिला खोत, विश्वास आंबेकर, राजेंद्र पवार ,कविराज पाटोळे,भाऊसाहेब कर्डिले, गणेश तावरे,मनोज कदम, शैल कंटोळी, रविंद्र राय, दिलीप सुपे, दीपक गायकवाड, प्रविण विरणक, यांनी रात्रभर फिरून आरोपींना सापळा रचून अटक केली.  

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक