शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करुन ४ वर्षे फरार असलेल्या पतीला अटक; LPG सिलेंडर बुक करताच मिळालं लोकेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:39 IST

पंजाब पोलिसांनी एका माजी कॅप्टनला पत्नीच्या हत्येप्रकरणी ४ वर्षांनंतर अटक केली आहे.

पंजाबपोलिसांनी एका माजी कॅप्टनला पत्नीच्या हत्येप्रकरणी ४ वर्षांनंतर अटक केली आहे. संदीप तोमर असं या आरोपीचं नाव असून त्याला मध्यप्रदेशातील पांढुर्णा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं. पोलीस आरोपीच्या बँक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवून होतं. याच दरम्यान त्याने एक एलपीजी (LPG) सिलेंडर बुक केला, ज्यावरून पोलिसांनी त्याचा मागोवा घेत त्याला अटक केली. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याची शिक्षा कायम ठेवली होती, त्यानंतर आरोपी फरार झाला होता.

संदीप तोमरच्या सासरच्या मंडळींनी त्याच्या अटकेची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर या तपासाला गती आली. आरोपीला पकडण्यासाठी एसपी आसवंत सिंह यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली. एसआयटीने 'नॅशनल इंटेलिजन्स ग्रिड'च्या मदतीने तपास केला आणि आरोपीचे खरे पॅन कार्ड शोधून काढलं. या पॅन कार्डच्या आधारे त्याच्या बँक खात्यांची माहिती मिळवण्यात आली. तपासात पोलिसांना आरोपीच्या एका बँक खात्याचा शोध लागला.

सापळा रचून केली अटक 

बँक खात्याच्या तपासणीत असं समोर आलं की, एक खासगी कंपनी दरमहा त्याच्या खात्यात पगार जमा करत होती. या बँक खात्याशी एक मोबाईल नंबरही लिंक होता, ज्यावरून आरोपी पांढुर्णा जिल्ह्यात असल्याचं स्पष्ट झालं. बँक स्टेटमेंटची अधिक चौकशी केली असता, पोलिसांना 'भारत गॅस'च्या एका सिलिंडरसाठी केलेल्या पेमेंटची माहिती मिळाली. पोलिसांनी गॅस एजन्सीशी संपर्क साधला असता, ज्या भाड्याच्या घरात गॅसची डिलिव्हरी झाली होती, त्याचा पत्ता मिळाला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

२०१४ मध्ये केली होती पत्नीची हत्या

मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आरोपीला आता पंजाबमध्ये परत आणण्यात आलं आहे. अटकेच्या भीतीने तो देशाच्या विविध भागांत लपून राहत होता. आरोपी संदीप तोमर '१२ बिहार रेजिमेंट'मध्ये कार्यरत होता. २०१४ मध्ये त्याने आपली पत्नी श्वेता हिची गळा दाबून हत्या केली होती आणि हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा बनाव रचला होता. या प्रकरणी त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, तसेच त्याला बडतर्फ करून फिरोजपूर जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. २०१९ मध्ये त्याला जामीन मिळाला होता, मात्र २०२२ मध्ये उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कायम ठेवल्याने तो फरार झाला होता.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Absconding Husband Arrested After 4 Years for Wife's Murder.

Web Summary : A former army captain, Sandeep Tomar, was arrested in Madhya Pradesh after four years on the run for his wife's murder. Police tracked him down via an LPG cylinder booking. He was initially convicted in 2014, then fled after his sentence was upheld in 2022.
टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी