शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:24 IST

एका पतीने स्वतःच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवण्याचा निर्णय घेतला, आणि हा निर्णय गावातील पंचायतीने पतीच्या उपस्थितीत दिला गेला आहे.

झारखंडच्या सरायकेला जिल्ह्यातील आरआयटी पोलीस स्टेशन परिसरातील सीतारामपूरच्या पलासडीह गावातून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका पतीने स्वतःच्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवण्याचा निर्णय घेतला, आणि गंमत म्हणजे, हा निर्णय गावातील पंचायतीने पतीच्या उपस्थितीत दिला गेला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही गावकऱ्यांच्या विरोधामुळे माघार घ्यावी लागली.

चांडिलच्या चिलगु पंचायतीतील एक तरुण आपल्या मित्रासोबत सोमवारी रात्री पलासडीह येथे आपल्या विवाहित प्रेयसीला भेटायला कारने आला होता. तो मुलीला गाडीत घेऊन जात असताना गावकऱ्यांनी त्यांना घेरले. त्यांनी प्रियकर आणि त्याच्या मित्राला गाडीतून बाहेर काढले आणि त्यांना मारहाण केली. यानंतर महिलेसह तिघांनाही रात्रभर ओलीस ठेवण्यात आले होते.

पोलिसांनाही माघार घ्यावी लागली!या घटनेची माहिती मिळताच, एसडीपीओ समीर कुमार सवैया आणि आरआयटी पोलीस स्टेशनचे प्रभारी विनय कुमार सिंह आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांनी हा 'सामाजिक मुद्दा' असल्याचे सांगत पोलिसांना हस्तक्षेप करू दिला नाही. गावकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली, पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.

तीन पंचायतींनी दिला 'अजब' निकालमंगळवारी सकाळी पलासडीह गावात सामाजिक परंपरेनुसार ग्रामसभा भरली. यामध्ये महिलेचे सासरचे, तिचे आई-वडील आणि तिच्या प्रियकराच्या गावातील पंचायतीचे सदस्य असे तिन्ही गट एकत्र बसले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत चाललेल्या या पंचायतीत जो निर्णय झाला, तो ऐकून महिलेचा पतीही अवाक् झाला.

एक अटही घातली!पंचायतीने निर्णय दिला की, महिलेला तिच्या प्रियकरासोबत पाठवण्यात येईल. त्या बदल्यात, प्रियकराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड भरल्यानंतर महिलेला तिथेच घटस्फोट देऊन तिच्या प्रियकरासोबत पाठवण्यात आले. हा अनोखा निर्णय आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. प्रेमसंबंधांमुळे कुटुंबात निर्माण झालेल्या समस्येवर पंचायतीने अशा प्रकारे तोडगा काढल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे, तर काहींनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडhusband and wifeपती- जोडीदार