आम्हाला काही माहिती नाही; परमबीर आणि सचिन वाझे भेटीवर नवी मुंबई आयुक्तांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 04:04 PM2021-11-30T16:04:34+5:302021-11-30T16:05:04+5:30

Parambir Singh And Sachin Vaze : नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि त्यांचे माजी सहकारी आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यातील कथित भेटीबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.

We do not have any information; Revealed by Navi Mumbai Commissioner on Parambir singh and Sachin Waze meeting | आम्हाला काही माहिती नाही; परमबीर आणि सचिन वाझे भेटीवर नवी मुंबई आयुक्तांनी केला खुलासा

आम्हाला काही माहिती नाही; परमबीर आणि सचिन वाझे भेटीवर नवी मुंबई आयुक्तांनी केला खुलासा

Next

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त पर बीर सिंग यांनी सोमवारी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची भेट घेतली आणि दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील इमारतीत सुमारे तासभर त्यांच्यात चर्चा झाली. जेथे न्या.चांदीवाल आयोग चौकशीची कार्यवाही करत होती. याबाबत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि त्यांचे माजी सहकारी आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यातील कथित भेटीबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.

सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलिसांचा वापर करून खंडणीचे रॅकेट चालविल्याचा आरोप करत त्यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या वर्षी 30 मार्च रोजी चांदीवाल आयोगाची स्थापना केली होती. 

दोघांमध्ये तासभर चर्चा

सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केबिनमध्ये बसून सुमारे तासभर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर आता मुंबई पोलीस या भेटीचा तपास करणार आहेत. या भेटीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले. अशा प्रकारे दोघांना भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्या भेटीत नेमकं काय झालं, याचा तपासपोलिस करत आहेत.

 

Web Title: We do not have any information; Revealed by Navi Mumbai Commissioner on Parambir singh and Sachin Waze meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.