शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

Video : खळबळजनक! भाजपाच्या आमदारांनी कुख्यात गुंड विकास दुबेची केली मदत, चौकशीचा व्हिडिओ उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 20:21 IST

दुबेविरोधातील फौजदारी खटल्यांमध्ये नेत्यांनी बचावासाठी जोरदार प्रयत्न केले असल्याचा दावा दुबेने केला आहे.

ठळक मुद्देहा व्हिडिओ २०१७ सालचा आहे. विकास दुबेला एसटीएफने लखनऊ येथून अटक केली. विकास हा कुख्यात गुन्हेगार असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे आणि त्याने एसटीएफची कारवाई टाळण्यासाठी सत्ताधारी आमदारांची नावे वापरली आहेत.

लखनऊ - कानपूरच्या बिकरू गावात ८ पोलिसांची हत्या करणारा आरोपी विकास दुबे अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. अशी भीती व्यक्त केली जात आहे की, विकासने नेपाळ किंवा मध्य प्रदेशच्या दरीत आश्रय घेतला आहे. दरम्यान २००६ आणि २०१७ मधील त्याचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. दोन्ही व्हिडिओंमध्ये विकास दुबे आपल्या राजकीय संबंधांची साक्ष देताना दिसत आहेत. दुबेविरोधातील फौजदारी खटल्यांमध्ये नेत्यांनी बचावासाठी जोरदार प्रयत्न केले असल्याचा दावा दुबेने केला आहे.हा व्हिडिओ २०१७ सालचा आहे. विकास दुबेला एसटीएफने लखनऊ येथून अटक केली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्र कायदा लागू करण्यात आला. एसटीएफने त्याच्यावर एका हत्येबाबत चौकशी केली. त्यात विकासने सांगितले की, त्याच्या हत्येच्या कटात ही नावं जोडली गेली. त्यामुळे भाजपचे तत्कालीन आमदार भगवती सागर आणि अभिजित सांगा यांनी त्यांचा बचाव केला. विकासने ब्लॉक प्रमुख राजेश कमल, जिल्हा पंचायत अध्यक्ष गुडन कटियार यांची नावेही घेतली. या नेत्यांशी त्यांचे राजकीय संबंध असल्याचे विकास यांनी म्हटले आहे. तथापि, विकासाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी विकासाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. २०१७ मध्ये अभिजीत सांगा आणि भगवती सागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.विकास दुबेने २०१७ मध्ये पोलीस चौकशीदरम्यान हा दावा केला होता. मात्र, दोन्ही आमदारांनी त्याला नकार दिला आहे. विकास हा कुख्यात गुन्हेगार असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे आणि त्याने एसटीएफची कारवाई टाळण्यासाठी सत्ताधारी आमदारांची नावे वापरली आहेत. आमदार अभिजीत सांगा यांनी विकास दुबे याच्याशी कोणताही संबंधास नकार दिला आहे. ते म्हणाले, कानपूरमधील माझा मतदारसंघ बिठूर असून जवळील खेड्यांमधील लोक मदतीसाठी माझ्याकडे येतात. खरं तर, विकास दुबे इतर पक्षांना पाठिंबा देत असलेल्या प्रकरणांमध्ये मी अनेकदा कारवाई करण्याची शिफारस केली आहे. विकास दुबे हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांची नावे वापरत असत, असे सांगा सांगतात. त्याचवेळी बिल्हौरचे भाजप आमदार भगवती सागर म्हणाले की, दुबे याच्याविरोधात कोणत्याही परिस्थितीत आपण कोणतीही मदत केलेली नाही. त्यांची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मी त्याविरोधात गुन्हा देखील दाखल करेन. दोन्ही आमदारांनी व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे. असे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे. 

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप  

 

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पांडवकडा धबधब्यावर जाणं पर्यटकांना भोवल, ५९ जणांवर पोलिसांची कारवाई

टॅग्स :PoliceपोलिसBJPभाजपाMLAआमदारUttar Pradeshउत्तर प्रदेश