Video : The drunken police officer sped away and drove the woman away | Video : दारूच्या नशेत पोलीस अधिकाऱ्याने भरधाव वेगाने कारने महिलेला नेले फरफटत 

Video : दारूच्या नशेत पोलीस अधिकाऱ्याने भरधाव वेगाने कारने महिलेला नेले फरफटत 

ठळक मुद्देघटनास्थळी हजर असलेल्या लोकांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला रस्त्यावरून उचलण्याचा प्रयत्न केला. पण ड्राईव्हर पुन्हा कारने सुरू केली आणि महिलेवरुन कार नेली. या घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपीची ओळख योगेंद्र अशी झाली आहे. हा दिल्ली पोलिस दलातील  56 वर्षांचा पोलीस उपनिरीक्षक आहे. घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत होता.

दिल्लीत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी दिल्लीतील चिल्ला गावात एका महिलेला वेगवान कारने फरफटत नेले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वृत्तसंस्था एएनआयने शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या एका महिलेला वेगवान कारने धडक दिली. वेगवान कारला धडक दिल्यानंतर एका अरुंद गल्लीत थांबण्याच्या वेळी महिला रस्त्यावर खाली जखमी होऊन पडली.


घटनास्थळी हजर असलेल्या लोकांनी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तिला रस्त्यावरून उचलण्याचा प्रयत्न केला. पण ड्राईव्हर पुन्हा कारने सुरू केली आणि महिलेवरुन कार नेली. ड्रायव्हरला मात्र नंतर काही जणांनी पकडले. दरम्यान, ती महिला रस्त्यात पडलेली पाहून काही जणांनी या महिलेला दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीच्या गाझीपूर परिसराजवळील चिल्ला गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपीची ओळख योगेंद्र अशी झाली आहे. हा दिल्ली पोलिस दलातील  56 वर्षांचा पोलीस उपनिरीक्षक आहे. घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत होता. “आरोपी पोलीस उपनिरीक्षक आहे, घटनेच्या वेळी त्याने मद्यपान केलेलं होतं. त्याला अटक करण्यात आली आहे. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, ”अशी माहिती एएनआयला पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

 

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

Web Title: Video : The drunken police officer sped away and drove the woman away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.