शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

दिवसभर फिरवण्यासाठी गाडी पाहिजे म्हणून दुचाकी चोरणारे दोघे जेरबंद; चार लाखांच्या १० दुचाकी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 6:13 PM

भोसरी, एमआयडीसी, खडकी व सांगवी परिसरातून आरोपी यांनी या दुचाकी चोरल्या असल्याचे उघड झाले.

ठळक मुद्देआठ दुचाकी चोरी झाल्याबाबत भोसरी, खडकी, भोसरी एमआयडीसी व सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे

पिंपरी : दिवसभर फिरवण्यासाठी गाडी पाहिजे म्हणून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन युवकांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून चार लाखांच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी रविवारी (दि. ९) ही कारवाई केली.स्वप्निल राजू काटकर (वय १९, रा. दिघीरोड, आदर्शनगर, भोसरी) व राहुल मोहन पवार (वय १९, रा. मधुबन सोसायटी क्रमांक २, चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी उड्डाणपुलाखाली, आळंदी रोड येथे आरोपी दुचाकीसह सशंयीतरित्या थांबलेले असून ते रात्री तेथे दिसत असतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी यांना पकडले. तेव्हा त्यांच्याकडील दोन दुचाकींबाबत चौकशी केली असता त्यांनी त्या दुचाकी चोरून आणल्याचे उघड झाले. त्यामुळे अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखीन आठ दुचाकी चोरल्याचे उघड झाले. चार लाख रुपये किमतीच्या १० दुचाकी पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केल्या. भोसरी, एमआयडीसी, खडकी व सांगवी परिसरातून आरोपी यांनी या दुचाकी चोरल्या असल्याचे उघड झाले. यातील आठ दुचाकी चोरी झाल्याबाबत भोसरी, खडकी, भोसरी एमआयडीसी व सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. उर्वरीत दोन दुचाकींच्या मूळ मालकास संपर्क साधला असता त्यांनी तक्रार द्यावयाची नसल्याबाबत पोलिसांना सांगितले. दुसरी दुचाकी ही नागपूरची असून ती संगमनेर येथून चोरीस गेली. या दुचाकीबाबत अधिक तपास सूरू आहे.चोरलेली दुचाकी दिवसभर फिरवून रात्री भोसरी येथील उड्डाणपुलाखालील पार्किंगमध्ये पार्क करून चोरटे घरी जात असत. यातील काही चोरीच्या दुचाकी आरोपी यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री केल्याचे समोर आले आहे. गाडीचे कागदपत्र नंतर देतो, असे सांगून या दुचाकी त्यांनी विक्री केल्या. या दुचाकी देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र गावंडे, सचिन उगले, गणेश सावंत, विजय मोरे, विशाल भोईर, नितीन खेसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीtwo wheelerटू व्हीलरArrestअटक