Join us  

राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

अफगाणिस्तानने ICC Men’s T20 World Cup 2024 साठी त्यांचा १५ खेळाडूंचा संघ घोषित केला आहे, ज्यामध्ये राशिद खान संघाचे नेतृत्व करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 10:56 PM

Open in App

अफगाणिस्तानने ICC Men’s T20 World Cup 2024 साठी त्यांचा १५ खेळाडूंचा संघ घोषित केला आहे, ज्यामध्ये राशिद खान संघाचे नेतृत्व करणार आहे. २०२२ च्या आवृत्तीच्या तुलनेत अफगाणिस्तानने त्यांच्या संघात काही बदल केले आहेत. करीम जनात, मोहम्मद इशाक आणि नूर अहमद या युवा खेळाडूंची नावे संघात आहेत. गेल्या वर्षीच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप मध्ये अफगाणिस्तानचे नेतृत्व करणारा हशमतुल्ला शाहिदी या संघाचा भाग नाही. २०२२ मध्ये त्याचे शेवटचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता. 

या वर्षी मार्चमध्ये आयर्लंडविरुद्ध अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवा खेळाडू नांग्याल खरोटीलाही संघात स्थान मिळाले आहे. २० वर्षीय खेळाडूने त्या मालिकेत केवळ ५.९० च्या इकॉनॉमीसह तीन सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या होत्या.  अफगाणिस्तानचा आणखी एक युवा खेळाडू म्हणजे यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद इशाक, जो २०२० आणि २०२२ च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाचा भाग होता.

रशीद मुजीब उर रहमान, नूर अहमद, नांग्याल खरोटी आणि अनुभवी मोहम्मद नबी यांच्यासह फिरकी विभागाचे नेतृत्व करेल. नवीन-उल-हक, फरीद अहमद आणि फझलहक फारूक यांनी आपली जागा कायम ठेवली आहे आणि अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. 

अफगाणिस्तान संघ: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झाद्रान, अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशीद खान, नांग्याल खरोटी, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिकराखीव: सेदिक अटल, हजरतुल्ला झाझई, सलीम साफी 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024अफगाणिस्तान