संगमनेरात धक्कादायक प्रकार, रुग्णवाहिकेतून देशी दारुची वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 11:37 IST2021-04-23T11:37:22+5:302021-04-23T11:37:51+5:30

Crime News : या रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात देशी दारु आढळून आली.

transport of native liquor by ambulance in sangamner | संगमनेरात धक्कादायक प्रकार, रुग्णवाहिकेतून देशी दारुची वाहतूक

संगमनेरात धक्कादायक प्रकार, रुग्णवाहिकेतून देशी दारुची वाहतूक

ठळक मुद्देरुग्णवाहिका व त्यातील दोघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

संगमनेर : देशी दारूची वाहतूक होत असलेली रूग्णवाहिका संगमनेर शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २३) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पकडली. 

संगमनेर बसस्थानकासमोर नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस वाहनांची तपासणी करत असताना तेथून जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी थांबण्याचा इशारा केला. 

या रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात देशी दारु आढळून आली. रुग्णवाहिका व त्यातील दोघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: transport of native liquor by ambulance in sangamner