शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 21:25 IST

तिघांविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद (युपीए), कट रचणे, तसेच इतर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबंदी असलेल्या मोओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन सागर तात्याराम गोरखे (वय ३२, रा़ वाकड), रमेश मुरलीधर गायचोर (वय ३६, रा़ येरवडा) ज्योती राघोबा जगताप (वय ३३, रा़ कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुणे : एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पुण्यातून कबीर कला मंचचे कार्यकर्ती ज्योती जगताप हिच्यासह सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना अटक केली. बंदी असलेल्या मोओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन सागर तात्याराम गोरखे (वय ३२, रा़ वाकड), रमेश मुरलीधर गायचोर (वय ३६, रा़ येरवडा) ज्योती राघोबा जगताप (वय ३३, रा़ कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
 
तिघांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग असून फरार आरोपी मिलिंद तेलतुंबडे याच्या संपर्कात ते आले होते़ गडचिरोलीतील जंगलात त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. एल्गार परिषदेच्या आयोजनात त्यांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

तिघांविरोधात बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद (युपीए), कट रचणे, तसेच इतर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे़ पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी दोषारोपपत्रदाखल केले होते. त्यानंतर एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे़ या प्रकरणात एनआयएने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलाखा, प्रा. हनी बाबु यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात गोरखे, गायचोर, जगताप यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले़ शहरी भागात मोओवादी विचारधारेचा प्रसार करणारे मिलिंद तेलतुंबडे यांच्या संपर्कात असल्याचे दिसून आले. त्यानंतर तिघांना एनआयएने अटक केली.  मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात मंगळवारी तिघांना हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवस एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :ArrestअटकNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाElgar morchaएल्गार मोर्चाPuneपुणेCourtन्यायालय