धक्कादायक! तरुणीला जबरदस्ती वेश्या व्यवसायात गुंतवले; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 09:40 PM2020-07-24T21:40:43+5:302020-07-24T21:46:22+5:30

पोलीसांनी गुरूवारी घटनास्थळावरून अटक केलेल्या दिपक कुमार यास शुक्रवारी न्यायालयात उपस्थित केला असता त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश

Three arrested for forcing young woman into prostitution | धक्कादायक! तरुणीला जबरदस्ती वेश्या व्यवसायात गुंतवले; तिघांना अटक

धक्कादायक! तरुणीला जबरदस्ती वेश्या व्यवसायात गुंतवले; तिघांना अटक

googlenewsNext

वास्को: पश्चिम बंगाल येथील २३ वर्षीय तरुणीला जबरदस्ती वेश्या व्यवसायात गुंतवलेल्या तीन संशयित आरोपींना दक्षिण गोवा येथील वेर्णा पोलीसांनी गजाआड करून त्या युवतीची या व्यवसायातून सुटका केली. सदर युवतीची सुटका केल्यानंतर तीला मेरशी येथील सुधारगृहात (प्रोटेक्टीव्ह हॉम) पाठवण्यात आलेली आहे.

वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी (दि.२३) रात्री ७ ते ११.१५ च्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली. वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या थोड्याच अंतरावरील एका इमारतीच्या पहील्या मजल्यावरील ‘फ्लॅट’ मध्ये एका तरुणीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात गुंतवण्यात आल्याची माहीती पोलीसांना मिळाली. याबाबत माहीती मिळताच पोलीस निरीक्षक मोहन गावडे व वेर्णा पोलीस स्थानकावरील इतर अधिकारी - शिपायांनी तेथे छापा मारला. सदर ठिकाणी छापा मारला असता पश्चिम बंगाल येथील २३ वर्षीय तरुणीला जबरदस्ती वेश्या व्यवसायात गुंतवण्यात आल्याचे उघड झाले. पोलीसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करून त्या तरुणीची वैश्या व्यवसायातून सुटका केली. तसेच तिला यात गुंतवलेला संशयित आरोपी दिपक कुमार (वय २५, मूळ: उत्तरप्रदेश) याला घटनास्थळावरून अटक केली.

पोलीसांनी अटक केलेल्या दिपक कुमार याच्याशी नंतर कसून चौकशी केली असता या तरुणीला वैश्या व्यवसायात गुंतवलेल्या प्रकरणात अन्य दोघा संशयितांचा समावेश असल्याचे उघड झाले. यानंतर शुक्रवारी (दि. २४) पोलीसांनी सदर प्रकरणातील अन्य दोन संशयित अनिल कुमार (वय ४२, मूळ: उत्तरप्रदेश) व दिनेश साकत (वय ४१, मूळ: महाराष्ट्रा) यांना जुने गोवा येथून गजाआड करून अटक केली. वेर्णा पोलीसांनी सदर प्रकरणात अटक केलेल्या संशयितांच्या विरुद्ध भादस ३७०, ३७० ए (२) तसेच वैश्या व्यवसाय प्रतिबंधात्मक कायदा १९५६ च्या ३, ४, ५, ६  व ७ कलमाखाली गुन्हा नोंद केला असल्याची माहीती पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली.

पोलीसांनी गुरूवारी घटनास्थळावरून अटक केलेल्या दिपक कुमार यास शुक्रवारी न्यायालयात उपस्थित केला असता त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधीक्षाने बजावलेला असल्याची माहीती निरीक्षक मोहन गावडे यांनी दिली. वेश्या व्यवसायातून सुटका केलेल्या त्या तरुणीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तीला मेरशी येथील सुधारगृहात (प्रोटेक्टीव्ह हॉम) पाठवण्यात आले आहे. सदर प्रकरणात अन्य कोणाचा समावेश आहे काय याबाबतही पोलीस तपास करीत आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या...

सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले

दुचाकीस्वारांनो! केंद्राने नियम बदलले; अपघात टाळण्यासाठी नवा आदेश

लॉकडाऊनने एसटीचे आर्थिक गणित बिघडवले; स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी

बापरे! शेअर बाजारात Axis ने धुमाकूळ घातला; तब्बल 6553 टक्क्यांची वाढ नोंदविली, कारण वाचा...

घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांची प्रोसेस

सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

सीरमच्या आदार पुनावालांची कोरोना लसीवर मोठी घोषणा; '30- 40 कोटी डोस डिसेंबरपर्यंत'

Web Title: Three arrested for forcing young woman into prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.