सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 05:23 PM2020-07-24T17:23:14+5:302020-07-24T19:40:57+5:30

माजी खासदार संजय काकडे यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा दावा केला आहे. आगामी निवडणुकांत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार असल्याचे भाकित काकडे यांनी केले आहे.

Earthquake soon in Maharashtra politics; Sanjay Kakade's prediction on Pawar-Thackeray pattern | सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

googlenewsNext

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भविष्यातील निवडणुका या भाजपाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र लढविण्याची शक्यता आहे. यावर भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी पक्षाला धोक्याचा इशारा दिला आहे. 


काकडे यांनी भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा दावा केला आहे. आगामी निवडणुकांत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार असल्याचे भाकित काकडे यांनी केले आहे. ही भाजपासाठी धोक्याची घंटा असणार आहे. गेल्या मागील 3 महिन्यांपासून त्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचं जागावाटपही निश्चित झालं आहे, असा गौप्यस्फोटही काकडे यांनी केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता आहे. 


सरकार पाडायला नंबर गेम लागतो, हिंमत लागत नाही. आमचे सरकार हे जसे आमच्या कर्माने गेले तसेच हे सरकार देखील त्यांच्या कर्माने जाणार आहे. आमच्या सरकारकाळात शिवसेने नेते खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरत होते. आता त्यांचे काय झाले? असा प्रश्नही काकडे यांनी विचारला आहे. हा सावध राहण्याचा काळ असल्याचा इशारा त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला आहे. 


काही वृत्तवाहिन्यांनुसार महाराष्ट्रात पुढील काळात महाविकास आघाडी निवडणुका लढविण्याबाबत हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी राज्य मंत्रीमंडळ बैठकीआधी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे चर्चा झाली. या बैठकीत पुढील निवडणुका एकत्र लढण्याबाबत चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. 


ठाकरे आणि अजित पवार यांच्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद दूर करण्याची चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमी आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचं आहे. पुढील निवडणुकाही एकत्र लढवायच्या आहेत, असे संदेश नेत्यांपर्यत पोहचविल्याचे सुत्रांनी सांगितले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

बापरे! शेअर बाजारात Axis ने धुमाकूळ घातला; तब्बल 6553 टक्क्यांची वाढ नोंदविली, कारण वाचा...

सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले

घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांची प्रोसेस

सीरमच्या आदार पुनावालांची कोरोना लसीवर मोठी घोषणा; '30- 40 कोटी डोस डिसेंबरपर्यंत'

करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...

चीन एक पाऊल पुढे? कोरोना लसीचा दुसरा टप्पा यशस्वी; लान्सेंटमध्येच प्रसिद्धी

अखेर स्वस्तातला OnePlus Nord 5G लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत

Web Title: Earthquake soon in Maharashtra politics; Sanjay Kakade's prediction on Pawar-Thackeray pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.