बापरे! शेअर बाजारात Axis ने धुमाकूळ घातला; तब्बल 6553 टक्क्यांची वाढ नोंदविली, कारण वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 07:34 PM2020-07-24T19:34:06+5:302020-07-24T19:37:10+5:30

अॅक्सिसच्या शेअरमध्ये आलेली उसळी पाहून शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांचीही गाळण उडाली होती. नंतर त्यांनी काही तांत्रिक समस्या उद्भवल्याने शेअरमध्ये एवढी वाढ झाल्याचे कारण सांगितल्याने सर्वांना हायसे वाटले.

Technical glitch at NSE push Axis Gold, Axis Nifty ETFs higher; crossed 6500 percent | बापरे! शेअर बाजारात Axis ने धुमाकूळ घातला; तब्बल 6553 टक्क्यांची वाढ नोंदविली, कारण वाचा...

बापरे! शेअर बाजारात Axis ने धुमाकूळ घातला; तब्बल 6553 टक्क्यांची वाढ नोंदविली, कारण वाचा...

googlenewsNext

आज सकाळी शेअर बाजारात एकच खळबळ उडाली. Axis Nifty ETF च्या शेअरने अचानक 6553 टक्क्यांनी उसळी घेतली तर Axis Gold ETF मध्ये 741 टक्क्यांची वाढ झाली. सकाळी सकाळीच अशा प्रकारे त्सुनामी पाहून भल्याभल्या गुंतवणूकधारकांची भंबेरी उडाली होती. कारण कोणतेही कारण नसताना एवढ्य़ा मोठ्या प्रमाणात शेअरने उसळी घेणे कोड्यात टाकणारे होते. 


अॅक्सिसच्या शेअरमध्ये आलेली उसळी पाहून शेअर बाजाराच्या अधिकाऱ्यांचीही गाळण उडाली होती. नंतर त्यांनी काही तांत्रिक समस्या उद्भवल्याने शेअरमध्ये एवढी वाढ झाल्याचे कारण सांगितल्याने सर्वांना हायसे वाटले. मात्र, तोपर्यंत काही शेअर धारकांनी यामध्ये हात धुवून घेण्याचाही प्रयत्न केला. 
Axis Gold ETF हा शेअर 22 जुलैलै 4367 रुपयांवर बंद झाला होता. मात्र, 23 जुलैला हा शेअर केवळ 52.35 रुपयांनी दिसत होता. 24 जुलैला जेव्हा बाजार सुरु झाला तेव्हा या शेअरची किंमत 5180 रुपये होती. यामुळे या शेअरमध्ये 6553 टक्क्यांची उसळी दाखविण्यात येत होती. आता बाजार बंद झाल्यानंतर हा शेअर NSE वर 3482 रुपये दिसत आहे. 


तर Axis Nifty ETF चा शेअर 22 जुलैला 1139 वर बंद झाला होता. 23 जुलैला क्लोझिंग व्हॅल्यू 136.80 रुपये दिसत होती. 24 जुलैला या शेअरचा दर 1380 रुपये होता. यामुळे या शेअरमध्ये 741 टक्के उसळी दिसत होती. आज बंद होताना हा शेअर 1151 वर आहे. 
NSE च्या माहितीनुसार आज Axis Nifty ETF चे 46.53 लाख आणि Axis Gold ETF चे 279 लाख व्यवहार झाले. यापैकी किती शेअर सकाळी 9.50 पर्यंत ट्रेड करण्यात आले याची माहिती मिळालेली नाही. रिटेल गुंतवणूकदारांना या चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. आता त्यांना मोठ्या ETF मध्ये गुंतवणूक करावी लागणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.

काय झाला गोंधळ...
17 जुलैली एक्सिस गोल्डने घोषणा केल होती की, 24 जुलैला म्यूचुअल फंड विभागाला वेगळे केले जाणार आहे. याचा हिशेब 100 रुपयांच्या बदल्यात 1 रुपया असा होणार होता. तर शेअरची मूळ किंमत विभागली जाणार होती. याचा हिशेब 100 रुपयांना 10 रुपये असा होता. यामुळे सारा घोळ झाल्याचे शेअर बाजाराने जाहीर केले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले

घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांची प्रोसेस

सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

सीरमच्या आदार पुनावालांची कोरोना लसीवर मोठी घोषणा; '30- 40 कोटी डोस डिसेंबरपर्यंत'

करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...

चीन एक पाऊल पुढे? कोरोना लसीचा दुसरा टप्पा यशस्वी; लान्सेंटमध्येच प्रसिद्धी

Web Title: Technical glitch at NSE push Axis Gold, Axis Nifty ETFs higher; crossed 6500 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.