घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांची प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 03:55 PM2020-07-24T15:55:23+5:302020-07-24T19:41:25+5:30

खरेतर आधारकार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करण्याचे दोन मार्ग आहेत. एक ऑफलाईन आणि दुसरा ऑनलाईन. परंतू ऑफलाईनसाठी जवळचे आधार केंद्र किंवा पोस्टामध्ये जाण्याची गरज भासते. सध्या कोरोना काळामुळे पोस्टात जाणे धोक्याचे आहे.

Link mobile number to Aadhaar at home; Learn the process in just a few minutes | घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांची प्रोसेस

घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांची प्रोसेस

googlenewsNext

नवी दिल्ली : अनेकदा काही ना काही कारणाने मोबाईल नंबर बदलला जात आहे. मात्र, यामुळे बँक खाती, लाईट बिल तसेच आधार कार्डला जुना नंबर दिलेला असतो. तो च बदलल्यामुळे धावाधाव करावी लागते. प्रत्येक बँकेत जाऊन नवीन  अर्ज देऊन नंबर लिंक करावा लागतो. तसेच आधारचेही आहे. मात्र, आधारसाठी तुम्हाला कुठे अर्ज करावा लागत नाही. तर तुम्ही आधारसाठीचा मोबाईल नंबर अपडेट घर बसल्या करू शकता. 


खरेतर आधारकार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करण्याचे दोन मार्ग आहेत. एक ऑफलाईन आणि दुसरा ऑनलाईन. परंतू ऑफलाईनसाठी जवळचे आधार केंद्र किंवा पोस्टामध्ये जाण्याची गरज भासते. सध्या कोरोना काळामुळे पोस्टात जाणे धोक्याचे आहे. गर्दी टाळून रांगेत उभे राहून काम करणे जिकिरीचे आहे. यामुळे दुसरा मार्ग म्हणजे ऑनलाईन सोईचा आहे. 


या सिस्टिमचा वापर करून तुम्ही घरात बसल्या बसल्याच आधार आणि मोबाईलनंबर लिंक करू शकता. मोबाईल नंबर तपासणीसाठी वन टाईम पासवर्ड (OTP) प्रणालीचा वापर केला जातो. ओटीपीच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया. 

या स्टेप फॉलो करा...

  • तुमच्या मोबाईल नंबरवरून 14546 डायल करा. 
  • आता भारतीय किंवा एनआरआय या पर्यायाची निवड करा. 
  • यानंतर 1 आकडा दाबून तुमच्या फोन नंबरशी आधार कार्ड लिंक करण्याची परवानगी द्या. 
  • आता तुम्ही 12 आकडी आधार नंबर नोंदवा आणि 1 दाबून आधार नंबर पूर्ण नोंदविल्याची खात्री करा. 
  • यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. 
  • आता तुम्हाला तुमचा फोन नंबर नोंदवावा लागणार आहे. 
  • UIDAI च्या डेटाबेरसममधून तुमचे नाव, फोटो आणि जन्म तिथी घेण्यासाठी ऑपरेटरला परवानगी देण्यास सांगितले जाईल.
  • यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे ओटीपी मिळेल. त्याची नोंदणी करावी लागेल. 

झाले, तुमचा नवीन नंबर आधारला लिंक झाला. हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 1 आकडा दाबावा लागणार आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

बापरे! शेअर बाजारात Axis ने धुमाकूळ घातला; तब्बल 6553 टक्क्यांची वाढ नोंदविली, कारण वाचा...

सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले

सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

सीरमच्या आदार पुनावालांची कोरोना लसीवर मोठी घोषणा; '30- 40 कोटी डोस डिसेंबरपर्यंत'

करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...

चीन एक पाऊल पुढे? कोरोना लसीचा दुसरा टप्पा यशस्वी; लान्सेंटमध्येच प्रसिद्धी

अखेर स्वस्तातला OnePlus Nord 5G लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत

 

Web Title: Link mobile number to Aadhaar at home; Learn the process in just a few minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.