Bicyclists! The center changed the rules; New order to prevent accidents | दुचाकीस्वारांनो! केंद्राने नियम बदलले; अपघात टाळण्यासाठी नवा आदेश

दुचाकीस्वारांनो! केंद्राने नियम बदलले; अपघात टाळण्यासाठी नवा आदेश

नवी दिल्ली : देशातील एकूण अपघातांमध्ये दुचाकींच्या अपघाताचे प्रमाण मोठे आहे. तसेच अपघाती मृत्यूमध्येही दुचाकीस्वारांचा मोठा आकडा आहे. यामुळे केंद्र सरकारने रस्ते सुरक्षा नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. खासकरून दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तींसाठी हे नियम आहेत. (New Guidelines for two wheeler)


रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या या नवीन नियमांनुसार दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना दोन्ही बाजुला हात धरण्यासाठी हँड होल्डर असणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही बाजुंना फुटरेस्ट असणे आवश्यक करण्यात आले आहे. 
अनेकदा साडी किंवा ओढणी चाकात गुंडाळली गेल्याने दुचाकीचे चाक जाम होऊन अपघात झालेले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी मागच्या चाकाचा अर्धा भाग हा कव्हर केलेला असावा. त्यामुळे मागे बसणाऱ्याचे कपडे त्यात जाणार नाहीत. 


दुचाकीवर कमी वजनाचा कंटेनरही बसवता येणार आहे. त्याची लांबी 550 MM तर रुंदी 510 MM आणि उंची 500 MM पेक्षा  जास्त नसावी. यामध्ये 30 किलो पेक्षा जास्त वजन ठेवू नये. दुचाकीवर अशा प्रकारचं कंटेनर  बसविले तर मागे कोणालाही बसविण्य़ाची परवानगी नाही. 
स्कूटरवर विंडस्क्रीन लावता येणार आहे,. मात्र, याची काच सुरक्षित मटेरिअलपासून बनलेली हवी. तसेच कारमध्येही मागची काचेवर 70 टक्के दृष्यमानता असलेले safety glazing लावता येणार आहे. 


हे नवे नियम 1 जानेवारी 2022 पासून अस्तित्वात येणार आहेत. त्यानंतर ज्या दुचाकी उत्पादन करण्यात येतील त्यांच्यामध्ये AIS 146:2018 नुसार बदल केलेले असणार आहेत.  दरम्यान, ट्युबलेस टायरच्या कारना स्टेपनीशिवाय रस्त्यावर धावण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र, या कारमध्ये टायर रिपेअर किट आणि टायर प्रेशर मॉनिटर सिस्टिम (TPMS) असणे गरजेचे आहे. हा नियम येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लॉकडाऊनने एसटीचे आर्थिक गणित बिघडवले; स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी

बापरे! शेअर बाजारात Axis ने धुमाकूळ घातला; तब्बल 6553 टक्क्यांची वाढ नोंदविली, कारण वाचा...

सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले

घरबसल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करा; जाणून घ्या अवघ्या काही मिनिटांची प्रोसेस

सावध व्हा! जागावाटपही झाले; पवार-ठाकरे पॅटर्नवर संजय काकडेंचे भाकित

सीरमच्या आदार पुनावालांची कोरोना लसीवर मोठी घोषणा; '30- 40 कोटी डोस डिसेंबरपर्यंत'

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bicyclists! The center changed the rules; New order to prevent accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.