शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

तीन आरोपींना लाखोंच्या मेफेड्रोनसह अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 17:44 IST

पोलिसांनी तिन्ही आरोपीकडून ३६९.४ ग्रॅम एम डी, ३ मोबाईल, २ दुचाकी आणि १ चार चाकी असा एकूण ८४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल मिळून आला आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा - अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पोलिसांनी पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३६९.४ ग्रॅम वजनाच्या मेफेड्रोन या अंमली पदार्थ विक्रीकरीता जवळ बाळगणाऱ्या तीन आरोपींना गुरुवारी रात्री पकडले आहे. दररोज नालासोपारा शहरात अंमली पदार्थ मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस गुरुवारी रात्री तुळींज आणि धानिवबाग परिसरात अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. अंमली विरोधी पथकाचे पोलीस पेल्हार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील धानिवबाग तलाव ते गावदेवी मंदिरकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या रेल्वे ब्रिज खाली  तीन संशयित विश्वजित चौहान, नवास शेख आणि सूरज पडा हे आढळून आले. त्यांची पंचांसमक्ष अंग झडती घेतली असता विश्वजित चौहान याच्याकडे ३९ लाख रुपये किंमतीचे १९५.१ ग्रॅम, नवास शेख याच्याकडे २२ लाख ४० हजार रुपये किंमतीचे १११.५ ग्रॅम आणि सूरज पडा याच्याकडे १२ लाख ६० हजारांचे ६२.८ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ मिळून आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपीकडून ३६९.४ ग्रॅम एम डी, ३ मोबाईल, २ दुचाकी आणि १ चार चाकी असा एकूण ८४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर मुद्देमाल जप्त करून पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन कांबळे. पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे व पाठक, पोलीस हवालदार इंगळे, टक्के, पाटील, आव्हाड, पागधरे, घेरे यांनी केली आहे.