शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीला मारहाण करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी; पाषाणमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:38 IST

फोन उचलत नसल्याने केले कृत्य

पुणे : तू माझा फोन का उचलत नाही, असे म्हणून तरुणीला भररस्त्यात अडवून मारहाण करुन तिच्या चेहर्‍यावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार पाषाण परिसरात घडला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी अक्षय पवार(रा. सुस, ता़ मुळशी) याच्याविरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पाषाण येथे राहणार्‍या एका १८ वर्षाच्या तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीची मैत्रिण आणि अक्षय हे दोघे मित्र आहेत. त्यातून या तरुणीशी त्याच्याशी तोंडओळख झाली आहे. यापूर्वीही अक्षय याने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. ही तरुणी १ जून रोजी दुपारी आपल्या दुचाकीवरुन जात असताना अक्षय पवार हा रिक्षातून आला व त्याने या तरुणीला भररस्त्यात अडविले. 'तू माझे फोन का उचलत नाही ' , असे म्हणत तिच्या कानशिलात मारली. तसेच तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला त्याने यापुढे कुठे दिसली तरअंगावर अ‍ॅसिड फेकेन अशी धमकी दिली. याप्रकाराने घाबरलेल्या या तरुणीने हा सर्व प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत अक्षय पवार याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी अक्षय पवार याचा शोध घेतला. तर तो पळून गेलाअसल्याचे दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस