विद्यार्थिनीला शिक्षक पाठवायचा अश्लील मेसेज, व्हिडिओ, देत होता नापास करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 13:47 IST2022-03-03T13:43:41+5:302022-03-03T13:47:35+5:30
Crime News : सिंह म्हणाले की, शिक्षक गेल्या दोन महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ आणि संदेश पाठवत होता.

विद्यार्थिनीला शिक्षक पाठवायचा अश्लील मेसेज, व्हिडिओ, देत होता नापास करण्याची धमकी
छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकालाअटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस आरोपी शिक्षकाची चौकशी करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.
एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बैकुंठपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अश्वनी सिंह यांनी सांगितले की, 42 वर्षीय मोहम्मद नय्यर अन्सारी या सरकारी शाळेतील शिक्षकाला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. सिंह म्हणाले की, शिक्षक गेल्या दोन महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ आणि संदेश पाठवत होता.
'शिक्षक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता'
शिक्षक विद्यार्थिनीवर संबंध ठेवण्यासाठी दबावही आणत होता, असा आरोप आहे. मुलीने विरोध केला असता त्याने तिला परीक्षेत नापास करण्याची धमकी दिली. विद्यार्थिनीने ही माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. यानंतर विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.