ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:20 IST2025-06-13T18:16:54+5:302025-06-13T18:20:46+5:30

सोनम आणि राज तथा इतर तीन आरोपींच्या चौकशीनंतर पोलिस म्हणाले, चौथ्या प्रयत्नात राजचा खून यशस्वी झाला.

The reason that was being discussed, came to light Why was the killed raja Sonam told everything; the real mastermind came in light | ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

लग्नानंतर 15 दिवसांच्या आतच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप असलेली सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज यांनी आपले गुन्हे कबूल करायला सुरुवात केली आहे. मेघालय पोलिसांकडून होत असलेल्या चौकशीदरम्यान, सोमने राजाच्या हत्येमागील कारणांसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सूरू होती, तेच कारण सांगितले आहे. तिचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावून देण्यात आले. त्यामुळे ती नाराज होती.

सोनम आणि राज तथा इतर तीन आरोपींच्या चौकशीनंतर पोलिस म्हणाले, चौथ्या प्रयत्नात राजचा खून यशस्वी झाला. पाचही आरोपींनी इंदूरच्या वाहतूक व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी चौकशीनंतर या घटनेचा मास्टरमाइंड राज असल्याचे म्हटले आहे.

ईस्ट खासी हिल्सचे एसपी विवेक सायम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या कारणांसंदर्भात सोनम रघुवंशी म्हणाली, आपल्या कुटुंबाने आपल्यावर लग्नासाठी दबाव टाकला होता. याशिवाय, या प्रकरणात लव्ह अँगल असून राज कुशवाह या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड  आहे, असेही एसपी सायम यांनी म्हटले आहे.

सोनम आणि राजा यांचे ११ मे रोजी लग्न झाले होते. राजाला मारण्याचा प्लॅन लग्नानंतर नव्हे तर आधीच निश्चित झाला होता. सोनम राजाला मारण्याच्या प्लॅननुसारच शिलाँगला पोहोचली होती. येथे, दोघेही २३ मे रोजी बेपत्ता झाले होते. यानंतर २ जून रोजी, राजाचा मृतदेह एका दरीत सापडला तर सोनमला ९ मे रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये अटक करण्यात आली होती.
 

Web Title: The reason that was being discussed, came to light Why was the killed raja Sonam told everything; the real mastermind came in light