शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 19:04 IST

दुपारपासून ही युवती घरात एकटीच होती. जेव्हा विकास दुपारी त्याच्या आईला घेऊन डॉक्टरांकडे गेला तेव्हा युवती तिच्या खोलीत झोपलेली होती

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील गरफा परिसरात एका घरात ३५ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला आहे. लिव्ह इन् पार्टनरसोबत ही युवती इथं राहत असल्याचं समोर आले. मधुरिमा रॉय असं या मृत युवतीचं नाव असून तिचा मृत्यू कसा झाला हे अद्याप कोडं आहे. ही युवती या फ्लॅटमध्ये लिव्ह इन पार्टनर विकास दत्तासोबत राहत होती. कालीपूजेच्या रात्री विकासच्या फ्लॅटमध्ये पार्टी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी युवतीची तब्येत खराब झाली होती. त्यानंतर तिचा मृतदेह त्याच फ्लॅटमध्ये सापडला.

या युवतीची हत्या झाली की तिने आत्महत्या केली याबाबत स्पष्टता नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. युवतीसोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या विकासने म्हटलं की, मी माझ्या आजारी आईसोबत हॉस्पिटलला गेलो होतो. जेव्हा मी परत आलो तेव्हा मधुरिमा गंभीर अवस्थेत खाली पडलेली होती असं त्याने सांगितले. याच फ्लॅटच्या बाजूला असलेल्या रुममध्ये विकास दत्ताची आई राहते. 

शुक्रवारी रात्री गरफा परिसरात पोलिसांनी एका फ्लॅटमधून युवतीचा मृतदेह ताब्यात घेतला. दुपारपासून ही युवती घरात एकटीच होती. जेव्हा विकास दुपारी त्याच्या आईला घेऊन डॉक्टरांकडे गेला तेव्हा युवती तिच्या खोलीत झोपलेली होती. ती झोपल्याने विकासने तिला जाग न करता बाहेर गेला. परंतु संध्याकाळी जेव्हा तो घरी परत आला तेव्हा तिची अवस्था गंभीर होती. त्यानंतर विकासने तातडीने युवतीच्या आईसह नातेवाईकांना संपर्क केला. त्यानंतर १०० नंबरवरून पोलिसांना सूचना केली. पोलीस घटनास्थळी पोहचले त्यानंतर युवतीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टरांनी युवतीला मृत घोषित केले.

दरम्यान, युवतीचं मृत्यूचं कारण समोर आले नाही. जेव्हा पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा अर्धनग्न अवस्थेत होती असं स्थानिकांनी सांगितले. पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर युवतीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. कालीपूजेच्या रात्री विकास आणि मधुरिमासह अन्य लोकही होते. त्यांनी खूप दारू प्यायल्याचे स्थानिकांनी सांगितले. खोलीच्या बाहेर दारूच्या बाटल्या, सिगरेट पॅकेट पडलेले होते. मधुरिमा जवळपास २ वर्षापासून विकाससह रिलेशनशिपमध्ये राहत होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी