शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

३० दिवसांत दुप्पट परतावा देण्याचं आमिष; ‘पॉकेट फ्रेंडली’ने घातला लाखो रुपयांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 06:27 IST

माहीममधील रहिवासी असलेले ५८ वर्षीय तक्रारदार हे बेस्टमधून अधिकारी पदावरून डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त झाले.

मुंबई - प्रभादेवीतील पॉकेट फ्रेंडली इन्वेसमेंट ॲण्ड फायनान्स कन्सल्टन्सीमध्ये ३० दिवसांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बेस्टमधून सेवानिवृत्त झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह गुंतवणूकदारांकडून लाखोंची गुंतवणूक स्वीकारून पळ काढल्याचा प्रकार दादरमध्ये समोर आला आहे. सुनील गुप्ता असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी दादर पोलिस अधिक तपास करत आहेत.

माहीममधील रहिवासी असलेले ५८ वर्षीय तक्रारदार हे बेस्टमधून अधिकारी पदावरून डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त झाले. बेस्टमध्ये काम करत असताना एका सहकाऱ्याने त्यांना पॉकेट फ्रेंडली इन्वेसमेंट ॲण्ड फायनान्स कन्सल्टन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास ३० दिवसांत दुप्पट परतावा मिळत असल्याचे सांगितले. 

...आणि विश्वास बसलात्यानुसार, त्यांनीही सहकाऱ्यासोबत गुप्ता याच्या कार्यालयात जाऊन त्याची भेट घेतली. गुंतवणुकीसाठी आलेल्या लोकांची गर्दी बघून तक्रारदार यांना देखील दामदुप्पट योजनेवर विश्वास बसला.  त्यांनी भेट घेताच, गुप्ताने ३० दिवसांत दुप्पट परतावा ही योजना बंद झाली असून ४५ दिवसांत दुप्पट परतावा अशी आकर्षक योजना सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

अशी झाली फसवणूकगुप्ताच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने १ लाख ८० हजारांची  गुंतवणूक केली. आणखीन काही जणांनी सात लाख रुपये गुंतवले. गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा देण्याची तारीख उलटून गेली. मात्र परतावा न मिळाल्याने त्यांना संशय आला. त्यांनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत मागितली. तोपर्यंत गुप्ता पसार झाला होता.