शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 06:19 IST

४ शिक्षकांसह ९ जणांना अटक,  ९ जण चौकशीसाठी ताब्यात, सूत्रधार साताऱ्याचा, १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरगूड (जि. कोल्हापूर) : महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी (शिक्षक पात्रता) परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या आणि तीन लाखांत पेपर देणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी सोनगे (ता. कागल) येथून ४ शिक्षकांसह नऊ जणांना अटक केली आहे तर अन्य नऊ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार  महेश गायकवाड याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कराडमधून अटक केली. अटक केलेल्या आरोपींना दोन दिवसांची कोठडी मिळाली आहे.

रविवारी राज्यभरात विविध केंद्रांवर ४ लाख ४६ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेचा पेपर बाहेर काढण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील काही तरुण करत असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार यांना मिळाली. पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीनंतर सोनगे (ता. कागल) येथील शिवकृपा फर्निचर मॉलमध्ये छापा टाकला. त्यावेळी दत्तात्रय चव्हाण, गुरुनाथ चौगले, अक्षय कुंभार, किरण बरकाळे व नागेश शेंडगे हे त्याठिकाणी टीईटी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्याकडून मूळ कागदपत्रे घेऊन टीईटी पेपरची झेरॉक्स देण्याच्या तयारीत असल्याचे आढळले. 

याठिकाणी पेपर घेण्यासाठी पाच विद्यार्थीदेखील उपस्थित होते. याठिकाणी विविध शिक्षण संस्थांची प्रमाणपत्रे, कोरे चेक, प्रिंटर, मोबाइल, चारचाकी वाहन असा १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पेपर फोडणारे हेच ते आरोपी... 

दत्तात्रय आनंदा चव्हाण (वय ३२, ता. राधानगरी), गुरुनाथ गणपती चौगले (ता. राधानगरी), अक्षय नामदेव कुंभार (२७, ता. कागल), किरण साताप्पा बरकाळे (३०, ता. राधानगरी), नागेश दिलीप शेंडगे (३०, ता. राधानगरी), राहुल अनिल पाटील (३१, ता. गडहिंग्लज), दयानंद भैरू साळवी (४१, ता. कागल), अभिजित विष्णू पाटील (४०, ता. कागल) व रोहित पांडुरंग सावंत (३५, ता. राधानगरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा अधिक तपास सुरू आहे. 

चौकशीत उघड झाले की, साताऱ्यातील महेश गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, तोच टीईटी परीक्षेचा पेपर राहुल पाटील याला पुरवत असे. पाटील हा स्वतः एजंटमार्फत परीक्षार्थ्यांना पेपर देत असे व प्रत्येक विद्यार्थ्याकडून ३ लाख रुपये आणि शैक्षणिक मूळ कागदपत्रे घेत असे, असे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीexamपरीक्षा