शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भीषण उपघात! ट्रेलरमधील भली माेठी रिम कारवर काेसळली; चालकाचा चिरडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 18:04 IST

Accident Case :हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. सदर चालक नवीमुंबई मधील पेशाने डॉक्टर असल्याचे समजते.

ठळक मुद्दे कारमध्ये आदित्य अडकून पडले होते.सर्व बचाव यंत्रणेने कारच्या छताचा पत्रा ताेडून आदित्य यांना बाहेर काढले, पण त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

अंकुश माेरे

वावाेशी -  मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रेलरवरील कागदाची भली माेठी रिम कार वर पडली. त्यामध्ये कार अक्षरशः चपटी झाली. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. कारच्या छताचा पत्रा ताेडून कार चालाचा मृतदेह बाहेर काढावा लागला. हा अपघात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. सदर चालक नवीमुंबई मधील पेशाने डॉक्टर असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेदहा च्या सुमारास नवीमुंबई येथील डॉक्टर आदित्य तंखीवले हे हुंडाई आयटेन या त्यांच्या कारने एक्स्प्रेस हायवे वरुन पुण्याहून मुंबईकडे येत हाेते. त्यांच्या समोरुन कागादाची भली माेठी रिम घेऊन ट्रेलर जात हाेता.  ट्रेलर एका वळणावर कलांडला व पलटी झाला त्या ट्रेलर मध्ये कागदाचे भले मोठे रिम होते. ते रिम त्या ट्रेलर मधून निसटले. त्यातील काही रिम मागून येत असलेल्या आदित्य तंखीवले यांच्या कार वर कोसळले. रिमचे वजन खूप असल्याने काही कळायच्या आत आदित्य यांची कार त्या रिमखाली दबली गेली.  रिम पडल्याने कार अक्षरशः चपटी झाली आणि त्यात आदित्यही दाबले गेले. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तानच्या मदतीला या संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहचले पण खूप वेळ गेला होता. कारमध्ये आदित्य अडकून पडले होते.सर्व बचाव यंत्रणेने कारच्या छताचा पत्रा ताेडून आदित्य यांना बाहेर काढले, पण त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूRaigadरायगड