शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput: जाणून घ्या, कोण आहे ‘AU’? रिया चक्रवर्तीने याच नंबरवर केले होते ६३ कॉल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 13:57 IST

Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या कॉल डिटेल्समधून ती बॉलिवूडच्या अनेक बड्या व्यक्तींशी संपर्कात असल्याचं समोर आलं आहे.

ठळक मुद्देरियाने AU नावाने तिच्या फोनमध्ये एक नंबर सेव्ह केला आहे. हा नंबर संशयास्पद आहेअनन्या रियाची फॅमिली फ्रेंड आहे. या कारणास्तव, दोघांमध्ये वारंवार संभाषण सुरू होते.या क्रमांकावरुनही बरीच चर्चा होत आहे. मात्र, याबाबत स्पष्टीकरण रियाच्या टीमकडून आलं आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक चर्चांना सध्या उधाण आलं आहे. सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर मुंबई पोलीस तपासात काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतंय अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरे यांचेही नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू चौकशीत दररोज नवीन खुलासे उघड होत आहेत. सुशांतचे कॉल डिटेल रेकॉर्ड्सही समोर आले आहेत. तर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या कॉल डिटेल्समधून ती बॉलिवूडच्या अनेक बड्या व्यक्तींशी संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. रिया आमिर खान, रकुल प्रीत सिंग, आदित्य रॉय कपूर, राणा दग्गुबाती, सनी सिंग आणि श्रद्धा कपूर यांच्याशी बोलली आहे. तथापि, या यादीमध्ये एक नंबर देखील आहे जो संशयास्पद असल्याचं बोललं जाते.

मीडिया रिपोर्टनुसार रियाने AU नावाने तिच्या फोनमध्ये एक नंबर सेव्ह केला आहे. हा नंबर संशयास्पद असल्याचं सांगितले जाते. रियाने या क्रमांकावर ६३ वेळा संवाद साधला आहे. या क्रमांकावरुनही बरीच चर्चा होत आहे. मात्र, याबाबत स्पष्टीकरण देखील रियाच्या टीमकडून आलं आहे. AU नावाने सेव्ह केलेल्या या क्रमांकाबद्दल रिया चक्रवर्ती यांच्या टीमच्या वतीने म्हटलं आहे की, हा नंबर अनन्या उधासचा आहे. अनन्या रियाची फॅमिली फ्रेंड आहे. या कारणास्तव, दोघांमध्ये वारंवार संभाषण सुरू होते. मात्र, रिया आणि अनन्या यांच्यात इतके संभाषण का झाले हे उघड झाले नाही.

इतकचं नाही तर रियाने आमिर खानला एकदा फोन केला तर आमीरने तिला तीन मेसेज पाठवले होते. रियाने आदित्य रॉय कपूरला १६ वेळा कॉल केला तर आदित्यने तिला सात वेळा कॉल केला. ३० वेळा प्रीत सिंहला फोन केला तर त्यांच्याकडून १४ वेळा कॉल आला होता. रियाने श्रद्धा कपूरला तीन वेळा कॉल केला तर श्रद्धाने दोनदा फोन केला होता.

रियाला 'सोनू के टीटू की स्वीटी' फेम अभिनेता सनी सिंगने सात वेळा कॉल केला, तर तिने चार वेळा फोन केला. रिया राणा दग्गुबातीशीही बोलली. रियाने राणाला सात वेळा फोन केला तर त्याच्याकडून चार कॉल आले. सुशांतची प्रकृती बिघडल्यामुळे रिया महेश भट्ट यांच्याशी सतत संपर्कात होती. रियाने महेश भट्टला नऊ वेळा फोन केला. महेश भट्ट यांचे सात कॉल आले होते.

सुशांत सिंगच्या कॉल रेकॉर्डमध्ये काय?

या प्रकरणी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार सुशांतचं घर सोडल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि सुशांत यांच्यात कोणतंही संभाषण झालं नसल्याचं दिसून येते. ८ ते १४ जून या काळात सुशांतचे त्याच्या बहिणींसोबत अनेकदा फोनवरुन चर्चा झाल्याचं आढळून आलं होतं. सुशांत सिंग राजपूतचे वकील विकास सिंह यांनी मुलाखतीत म्हटलं होतं की, सुशांतच्या घरातून गेल्यानंतर रियाने सुशांतचा कॉल ब्लॉक केला होता. रिया आणि सुशांतमध्ये ८ ते १४ जूनदरम्यान काहीही संवाद झाला नाही. रियानेही सुशांतला फोन केला नाही तर सुशांतने तिला फोन केला नाही. रियाने जानेवारी महिन्यात १ दिवसात सुशांतला १९ वेळा कॉल लावल्याचं सांगितलं जात होतं. पण मृत्यूपूर्वी सुशांतच्या कॉल रेकॉर्डनुसार रियाचं त्याच्यासोबत काहीही बोलणं झालं नाही. सुशांतची बहिण राणी हिने सुशांतला ८ ते १४ जूनमध्ये एकाद कॉल केला होता. त्यानंतर सुशांतने बहिण राणीला एकदा कॉल केला होता. टॅलेंट मेनेजरने सुशांतला ५ वेळा कॉल केला होता. या काळात रियाने सुशांतला कॉल केला नाही. तर सुशांतची दुसरी बहिण मीतू हिने एकदा त्याला कॉल केला होता.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीPoliceपोलिस