शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

Sushant Singh rajput Case : CBI च्या रडारवर सुशांतच्या बहिणी, IPS भावोजी अन् डॉक्टरची होणार चौकशी 

By पूनम अपराज | Published: September 28, 2020 7:40 PM

Sushant Singh rajput Case : आयपीएस मेहुणे आणि डॉक्टर सुशांत सिंग यांच्या दोन बहिणींचीही सीबीआय चौकशीअंतर्गत चौकशी केली जाईल

ठळक मुद्देया आठवड्यात सीबीआयने एम्सच्या फॉरेन्सिक पॅनेलला आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर सीबीआयचे पथक पुन्हा तपासासाठी मुंबईला येईल.सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासणीत सीबीआयला अशा पाचपेक्षा जास्त तथ्य (पुरावे) सापडले आहेत, ज्यावरून सुशांतचे कुटुंबिय पूर्णपणे सीबीआयच्या रडारवर आले आहे.

नवी दिल्ली - सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीत सुशांतच्या कुटुंबियांना सामील केले जाणार आहे. आतापर्यंतच्या तपासणीदरम्यान सीबीआयला अशी काही तथ्य सापडले आहे, ज्याच्या आधारे सीबीआय सुशांतच्या दोन बहिणींसह सुशांतचा आयपीएस भावोजी आणि दिल्लीतील डॉक्टरची चौकशी करणार आहे. या आठवड्यात सीबीआयने एम्सच्या फॉरेन्सिक पॅनेलला आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर सीबीआयचे पथक पुन्हा तपासासाठी मुंबईला येईल.सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? याची उकल करण्यासाठी तपास करणाऱ्या सीबीआयला सुशांतची हत्या झाल्याचं सिद्ध करण्यासाठी आतापर्यंत तपासणीदरम्यान कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे सीबीआय आता या प्रकरणात पुढील तपास सुरू करणार आहे आणि त्यासाठी सीबीआयने या आठवड्यात एम्सच्या फॉरेन्सिक पॅनेलला सीबीआयकडे अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. जेणेकरून पुढील चौकशी सुरू होऊ शकेल. मात्र, एम्सच्या फॉरेन्सिक अहवालातून विशेष काही मिळणार नाही, असा सीबीआय तज्ज्ञांचे मत आहे. सीबीआय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत तपासात हत्येमागील स्पष्टीकरण झाले नव्हते, त्यामुळे आता सुशांतच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे याकडे सीबीआयचे लक्ष लागले आहे आणि आतापर्यंतच्या तपासादरम्यान सीबीआयला जे सत्य समोर आले आहे, त्यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि सुशांतचे कुटुंब सीबीआयच्या कक्षेत आले आहे.सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंतच्या सीबीआयच्या तपासणीत रिया आणि सुशांतचे कुटुंबीय असे दोन लोक आले आहेत आणि दोघांविरूद्ध त्यांच्यावर विविध गुन्हेगारी कलमांखाली पोलिसांत एफआयआर दाखल आहे, त्यामुळे सुशांतच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे. या दोघांची देखील चौकशी सुरू केली जाईल. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासणीत सीबीआयला अशा पाचपेक्षा जास्त तथ्य (पुरावे) सापडले आहेत, ज्यावरून सुशांतचे कुटुंबिय पूर्णपणे सीबीआयच्या रडारवर आले आहे.

उदाहरणार्थ: -सुशांतची बहीण प्रियंकाचे चॅट माझा मित्र एक प्रसिद्ध डॉक्टर आहे, ते मुंबईतल्या चांगल्या डॉक्टरांशी तुमचा संपर्क साधून देतील, सर्व गोपनीय राहतील, काळजी करू नका.जर त्याला नैराश्याने ग्रासले असेल तर हे औषध घ्या.गप्पांव्यतिरिक्त ओ पी सिंग यांनी जुलै २०२० मध्ये सिद्धार्थ पिठानी यांना फोन करून बिहार पोलिसांना रियाबद्दल चुकीची माहिती देण्यास सांगितले.जितकी बँक खाती आहेत, त्यांची नॉमिनी सुशांतची बहीणच आहे. या सर्व गोष्टींमुळे सुशांतचे कुटुंबीयही चौकशीच्या जाळ्यात आले आहे, असा सीबीआय तज्ज्ञांचे मत आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील डॉ.कुमार कुमार यांची चौकशी सीबीआय करणार आहे. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार सीबीआय नियमांनुसार या प्रकरणात चौकशी करत आहे. पहिला एफआयआर रियाविरोधात आहे, ज्यावर 15 कोटींची अफरातफर आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असे आरोप आहेत. आतापर्यंतच्या तपासात ईडीला 15 कोटी रुपयांच्या अफरातफरीबाबत काहीही पुरावे सापडलेले नाही. दुसरा एफआयआर सुशांतच्या कुटुंबाविरोधात आहे. चौकशीत आता आत्महत्येस कोणी प्रवृत्त केले याकडे लक्ष लागले असल्याने कोणालाही क्लीन चिट दिली जाऊ शकत नाही. अधिकारी म्हणाले की, एनसीबीच्या अटकेचा सुशांतच्या मृत्यूशी काही संबंध नाही. सीबीआय या प्रकरणात अधिकृतपणे म्हणाले की, सीबीआय प्रत्येक बाबींकडून तपास करत असून तपास अद्याप सुरू आहे. दुसरीकडे, एबीपी न्यूजने डॉ. सुधीर गुप्ता यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सीबीआयला विचार असे उत्तर दिले. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

 

महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपाला मिळाला जामीन 

 

कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक 

 

खळबळ! मनी लाँडरिंगप्रकरणी माजी पंतप्रधानांचे बंधू शहाबाज शरीफ यांना अटक

 

सावधान! हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी

 

धक्कादायक! मृत कोरोनाबाधित महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याDeathमृत्यूCBIगुन्हा अन्वेषण विभागRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती