Incident that tarnishes father's relationship, sexual abuse of 8-year-old girl | बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने प्रथम ऑगस्टमध्ये मुलीचा लैंगिक  छळ केला आणि २२ सप्टेंबरपर्यंत अत्याचार सुरूच ठेवले. सुरुवातीला मुलाने भीतीमुळे काहीच सांगितले नाही, परंतु मंगळवारी तिने तिच्या आईकडे घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. त्यांनतर आईने पो

मुंबई - गोरेगावमध्ये बापलेकिच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आठ वर्षांच्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली नराधम बापाला अटक केली आहे. या घटनेनंतर आरोपी बापाने मुलीला काठीने मारहाण केली. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. मंगळवारी बांगूर नगर पोलिसांनी 35 वर्षीय बापाला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने प्रथम ऑगस्टमध्ये मुलीचा लैंगिक  छळ केला आणि २२ सप्टेंबरपर्यंत अत्याचार सुरूच ठेवले. सुरुवातीला मुलाने भीतीमुळे काहीच सांगितले नाही, परंतु मंगळवारी तिने तिच्या आईकडे घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. त्यांनतर आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. “तिच्या आईकडून तक्रार आल्यानंतर आम्ही आरोपीला ताबडतोब अटक केली,” बांगूर नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणाले.  आरोपीविरोधात कलम  376 (२) (एफ) 376 (२),( एन), 377,  ३२४, ५०६ आणि पॉक्सो कायद्याचे कलम ४, ६,  आणि १० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती हिंदुस्थान टाईम्सने दिली आहे. बांगूर नगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

अलीकडेच मित्राच्या तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार सांताक्रुझ परिसरात घडला. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी ३८ वर्षीय व्यक्तीवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. गेल्या आठवड्यात शुक्रवारी हा प्रकार घडला. आरोपी हा पीडितेच्या शेजारच्या घरात राहत असून तिच्या वडिलांचा मित्र आहे. आरोपीच्या मुलासोबत पीडित मुलगी खेळायला यायची. शुक्रवारीही ती खेळत असताना आरोपीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. मुख्य म्हणजे त्यावेळी त्याची मुलगीही तिथे हजर होती. गुप्तांगात दुखू लागल्याने मुलीने घरच्यांना सांगितले. त्यानुसार तिला त्यांनी डॉक्टरकडे नेले, मात्र हा प्रकार कोणी केला अशी विचारणा केली. तेव्हा तिने आरोपीचे नाव सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

 

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

 

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!

 

धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या 

 

विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी 

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

 

Web Title: Incident that tarnishes father's relationship, sexual abuse of 8-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.