The gold ornaments on the body of the dead coronated woman disappeared | धक्कादायक! मृत कोरोनाबाधित महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब

धक्कादायक! मृत कोरोनाबाधित महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब

ठळक मुद्देभिंगार परिसरात राहणाऱ्या एका कोरोनाबाधित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

अहमदनगर: जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झालेल्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मयत महिलेच्या नातेवाईकांनी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेज मागविले आहे.

भिंगार परिसरात राहणाऱ्या एका कोरोनाबाधित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. सदर महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मृत्यू होण्याच्या आधी सदर महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव आला होता. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर दागिने नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत मयत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या संदर्भात तोफखाना पोलिसांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला पत्र देऊन सदर महिलेवर ज्या वार्डात उपचार सुरू होते तेथील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली आहे. जिल्हा रुग्णालयातून सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर सदर मयत महिलेच्या दागिन्याबाबत माहिती मिळू शकेल असे तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

 

महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपाला मिळाला जामीन 

 

कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक 

 

खळबळ! मनी लाँडरिंगप्रकरणी माजी पंतप्रधानांचे बंधू शहाबाज शरीफ यांना अटक

 

सावधान! हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी

 

Web Title: The gold ornaments on the body of the dead coronated woman disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.