Police arrested for taking bribe from police in yavatmal | कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक 

कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक 

ठळक मुद्देपुसद शहर पोलीस ठाण्यातील प्रशांत विजयराव थूल (३५, बक्कल नं.४२) असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. बोरी(खु) ता.पुसद येथील एका युवकाला जुगाराच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी शिपायाने लाच मागितली.

यवतमाळ : जुगाराच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलीस शिपायाने अडीच हजारांची लाच मागितली. एसीबी पथकाच्या पडताळणीत या शिपायाने एक हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले. नंतर संशय आल्याने त्याने लाच घेतली नाही. या शिपायाला लाच मागणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. 


पुसद शहर पोलीस ठाण्यातील प्रशांत विजयराव थूल (३५, बक्कल नं.४२) असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. बोरी(खु) ता.पुसद येथील एका युवकाला जुगाराच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी शिपायाने लाच मागितली. ही बाब १२ सप्टेंबरला एसीबी पथकाच्या पडताळणीत सिद्ध झाली. त्यावरून सोमवारी त्या शिपायाला एसीबी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात निरिक्षक हर्षराज अळसपुरे, निरिक्षक गजेंद्र क्षीरसागर, जमादार ज्ञानेश्वर शेंडे, अनिल राजकुमार, वसीम शेख, राहुल गेडाम, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे यांनी केली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

 

महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

 

Web Title: Police arrested for taking bribe from police in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.