सूरतमध्ये निळ्या ड्रमपेक्षाही भयंकर प्रकरण; बायकोला संपवलं अन् सासऱ्यांसोबत पोलीस स्टेशनला चकरा मारल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:53 IST2026-04-27T16:52:48+5:302026-04-27T16:53:27+5:30

सुरतमध्ये पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहासोबत भयंकर कृत्य केले.

Surat man murdered his wife and encased her body in a cement box he lived with their children for five days before staging missing person hoax | सूरतमध्ये निळ्या ड्रमपेक्षाही भयंकर प्रकरण; बायकोला संपवलं अन् सासऱ्यांसोबत पोलीस स्टेशनला चकरा मारल्या

सूरतमध्ये निळ्या ड्रमपेक्षाही भयंकर प्रकरण; बायकोला संपवलं अन् सासऱ्यांसोबत पोलीस स्टेशनला चकरा मारल्या

Surat Crime: देशभरात गाजलेल्या निळ्या ड्रम प्रकरणानंतर आणखी एक संतापजनक घटना गुजरातच्या सूरत शहरा घडली आहे. घरगुती वादातून एका माथेफिरु पतीने आपल्या डायटीशियन पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह चक्क सिमेंट आणि काँक्रीटमध्ये पुरुन टाकला. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या घरात पत्नीचा मृतदेह होता, त्याच घरात हा नराधम पाच दिवस आपल्या मुलांसोबत राहून पोलिसांची दिशाभूल करत होता.

४० वर्षीय विशाल साळवी हा काही काळापासून बेरोजगार होता, तर त्याची पत्नी शिल्पा साळवी (३९) ही सूरतच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये डायटीशियन म्हणून कार्यरत होती. त्यांचे लग्न २०१० मध्ये झाले असून त्यांना १३ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे. विशाल बेरोजगार असल्यामुळे घरात सतत पैशांवरून आणि घरगुती कारणावरून वाद होत असत. २१ एप्रिल रोजी अशाच एका वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले आणि विशालने शिल्पाचा गळा आवळून खून केला.

फिल्मी स्टाईलने मृतदेहाची विल्हेवाट

खून केल्यानंतर विशालने अतिशय क्रूर पद्धतीने डोकं चालवलं. त्याने शिल्पाचा मृतदेह एका लाकडी पेटीत टाकला आणि त्यावर सिमेंट व काँक्रीटचा जाड थर चढवला. असे केल्यामुळे मृतदेहाची दुर्गंधी बाहेर येणार नाही आणि कोणाला संशयही येणार नाही, अशी त्याची योजना होती. हे कृत्य केल्यानंतर त्याने गोदादरा पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची खोटी तक्रारही नोंदवली. तो इतका बिंधास्त होता की, छत्तीसगडहून मुलीला शोधायला आलेल्या सासऱ्यांसोबतही त्याने पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारल्या.

१३ वर्षांच्या मुलाने समोर आणलं सत्य

२५ एप्रिल रोजी विशालने आपल्या १३ वर्षांच्या मुलाच्या हातात एक चिठ्ठी दिली आणि तो तिथून पसार झाला. त्या मुलाने ती चिठ्ठी वाचून आपल्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवली. त्या चिठ्ठीत विशालने आपला गुन्हा कबूल केला होता. मी गुन्हा केला आहे आणि त्याला मीच जबाबदार आहे," असे त्याने लिहिले होते. या चिठ्ठीत मृतदेह कुठे लपवला आहे याचाही उल्लेख होता.

सिमेंट फोडले अन् सडलेला मृतदेह बाहेर आला

पोलीस तात्काळ माहिती मिळताच सलाबतपुरा भागातील त्या जुन्या घराकडे धावले. पहिल्या मजल्यावर त्यांना सिमेंटने भरलेला एक लाकडी बॉक्स दिसला. पोलिसांनी सिमेंटचा थर तोडला असता, आत शिल्पाचा पूर्णपणे सडलेला मृतदेह आढळून आला. पाच दिवस उलटल्यामुळे मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण झाली होती.

प्राथमिक तपासात, विशालला कोणतेही कामधंदा नसल्यामुळे आणि शिल्पा नोकरी करत असल्यामुळे त्यांच्यात सतत वाद व्हायचे. तसेच विशाल पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घेत असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. सध्या पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी विशाल साळवीचा शोध सुरू आहे.

Web Title : सूरत: पति ने पत्नी की हत्या की, शव छिपाया, ससुराल वालों से झूठ बोला।

Web Summary : सूरत में, एक व्यक्ति ने बहस के बाद अपनी आहार विशेषज्ञ पत्नी की हत्या कर दी, उसके शव को कंक्रीट में छिपा दिया और गुमशुदगी की झूठी रिपोर्ट भी दर्ज कराई। उसके बेटे ने अपराध का खुलासा किया, जिससे शव की खोज हुई। पुलिस आरोपी पति की तलाश कर रही है।

Web Title : Surat: Husband Kills Wife, Hides Body, Lies to In-Laws.

Web Summary : In Surat, a man killed his dietician wife after arguments, hid her body in concrete, and even filed a false missing person report. His son revealed the crime, leading to the discovery of the body. Police are searching for the accused husband.