शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Crime: सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 05:38 IST

Mumbai Crime News : अमायरा असे मृत मुलीचे नाव असून ती आई नाझियासोबत अँटॉप हिलच्या राजीव गांधीनगरातील बंगालीपुरा येथे राहण्यास होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अँटाॅप हिलमधून बेपत्ता झालेल्या चार वर्षांच्या चिमुरडीचा मंगळवारी सकाळी ससून डॉक येथील समुद्रात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सावत्र वडिलांनीच मुलीची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याचा संशय असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

अमायरा असे मृत मुलीचे नाव असून ती आई नाझियासोबत अँटॉप हिलच्या राजीव गांधीनगरातील बंगालीपुरा येथे राहण्यास होती. दोन वेळा लग्न मोडल्यानंतर नाझियाने नुकतेच इम्रान ऊर्फ इम्मू या तरुणाशी लग्न केले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत अमीरा घरी न परतल्याने तिचा शोध सुरू केला. अखेर तिचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने आईने सोमवारी रात्री अँटॉप हिल पोलिसांत तक्रार दिली.

अमायराचा शोध सुरू असताना, मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ससून डॉकजवळील समुद्रात मासेमारी करणाऱ्या गोपी धनू नावाच्या मच्छीमाराला  अमायराचा मृतदेह आढळला. त्याने मृतदेह बाहेर काढून कुलाबा पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवचिकित्सेसाठी जेजे रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत ओळख पटविण्यासाठी या चिमुकलीच्या मृतदेहाची छायाचित्रे मुंबईसह विविध पोलिस ठाण्यांना पाठवून तपास सुरू केला. मंगळवारी सकाळी अँटॉप हिल पोलिसांना याबाबत माहिती मिळताच अमायराचा शोध थांबला. या घटनेने तिच्या आईला धक्का बसला आहे. तिचा मृत्यू नेमका कसा झाला? याचा शोध पोलिस घेत आहे. 

लवकर झोपत नाही, सतत मोबाइल मागते अमायरा लवकर झोपत नव्हती. शिवाय सतत मोबाइल मागत होती. त्याच रागातून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

...म्हणून संशयसोमवारी रात्री सावत्र वडील इम्रानसोबत अमायराला बघितले होते. अमायरा हरवल्याची तक्रार दिल्यानंतर तोही बेपत्ता झाला. त्याचा फोनही बंद लागत असल्याने त्याच्यावरचा संशय आणखी बळावला होता.

याप्रकरणी पोलिसांनी इम्रानला ताब्यात घेतले आहे. तांत्रिक माहितीबरोबरच परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. इम्राननेच अमायराची हत्या करून तिला समुद्रात फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखाही याचा समांतर तपास करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईGame Addictionव्हिडिओ गेम व्यसन